Nandurbar Lok Sabha Election : झालेल्या अन् रखडलेल्या विकासाच्या मुद्यावर प्रचार रंगणार

Lok Sabha Election : नंदुरबार लोकसभा मतदारसंघात मुख्य उमेदवारांची नावे पक्षाने घोषित केली आहेत.
 Lok Sabha Election
Lok Sabha Election esakal

Nandurbar Lok Sabha Election : नंदुरबार लोकसभा मतदारसंघात मुख्य उमेदवारांची नावे पक्षाने घोषित केली आहेत. येथे अजूनही अपक्ष किंवा लहान- मोठ्या पक्षाचे उमेदवार निवडणूक रिंगणात राहतील, यात शंका नाही .मात्र खरी लढत भाजप व कॉंग्रेस उमेदवारांमध्येच रंगणार आहे. या लढतीत दोन्ही पक्षाकडून अनेक राजकिय, सामाजिक व विकास कामे आणि रखडलेला विकास या मुद्द्यांवरच प्रचाराची रणधुमाळी रंगणार आहे. (Nandurbar Lok Sabha Election campaign will be on issue of progress development )

असे सध्या दोन्ही पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमधील चर्चेतून स्पष्ट होत आहे. भाजपचे उमेदवार डॉ. हिना गावित यांनी उमेदवारी निश्‍चित मिळेल,असे समजून त्यांनी गेल्या वर्षभरापासून आपल्या निवडणुकीची तयारी सुरू केली होती. विकास कामांसोबतच आपण व आपल्या शासनाने मतदारसंघातील जनतेसाठी काय केले याचा लेखाजोखा ते मांडत होते.

तर कॉंग्रेसचे उमेदवार कोण हा प्रश्‍न सर्वांसमोर होता. माजी मंत्री ॲड. के. सी.पाडवी हेच उमेदवार राहतील असा अंदाज बांधला जात होता. पक्षीयस्तर व श्री. पाडवी यांच्या नियोजनावरून तसे लक्षात येत होते. त्यांनी धडगाव-अक्कलकुवा परिसरासाठी ते मंत्री असतांना मंजूर कामे न्यायालयीन लढाई लढून खेचून आणली. त्या कार्यक्रमांचे भूमिपूजन -उद्घाटनाच्या माध्यमातून जनतेपुढे गेले. (latest marathi news)

 Lok Sabha Election
Nandurbar Lok Sabha Election : गावितांच्या कन्येविरोधात पाडवींच्या पुत्राचे नाव चर्चेत

मात्र लोकसभा निवडणूकीचा कुठेही ऊहापोह त्यांनी केला नव्हता. कारण कॉंग्रेसमध्ये इच्छुकांची संख्या जास्त होती. त्यामुळे त्यांच्याकडून लोकसभा निवडणूकीसाठीची अशी पुर्वबांधणी झालेली नाही. भाजप - कॉंग्रेसने आता उमेदवार जाहीर केले आहेत. चित्र स्पष्ट झाले आहे. त्यामुळे भाजपने जरी वर्षभरापासून आपल्या मतदारसंघात शासनाने काय केले हे त्यांच्या नेत्यांच्या कार्यक्रमातून असो की, स्वतः उमेदवार असलेल्या डॉ. हिना गावित, राज्याचे मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी जनतेच्या मनात बिंबवले आहे.

मात्र तसे कॉंग्रेस अथवा इतर कोणत्याही पक्षाकडून झालेले नाही. असे असले तरी भाजपने त्यांचा पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत विकास हाच निवडणुकीतील प्रचाराचा आपला मुद्दा असणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

मात्र कॉंग्रेस स्थानिक स्तरावर रखडलेले प्रकल्प, बेरोजगारी, आरोग्य, वीज, यासह शेतकऱ्यांचे प्रश्‍न आणि शेवटी परिवार वाद असे मुद्दे घेऊन प्रचारात उतरणार असल्याचे कॉंग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये सुरू असलेल्या चर्चेतून दिसून येत आहे. त्यामुळे सध्याचा निवडणूकीत झालेला विकास व रखडलेला विकास हाच मुद्दा खरा प्रचाराचा मुद्दा ठरणार आहे.

 Lok Sabha Election
Nandurbar Lok Sabha Election 2024 : इच्छुकांमध्ये कही खुशी, कही गम!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com