Nandurbar Lok Sabha Election : निवडणुकीची प्रत्येक जबाबदारी समजून दक्षतापूर्वक पार पाडा : प्रांताधिकारी दळवी

Lok Sabha Election : आपल्या दैनंदिन आस्थापनेच्या कामकाजापेक्षा निवडणुकीचे काम थोडेसे वेगळे असले, तरी सकारात्मक राहून, प्रामाणिकपणे कर्तव्य पार पाडावे.
Assistant Election Returning Officer Subhash Dalvi guiding the employees appointed for the Lok Sabha elections through a slide show in the workshop.
Assistant Election Returning Officer Subhash Dalvi guiding the employees appointed for the Lok Sabha elections through a slide show in the workshop.esakal

Nandurbar Lok Sabha Election : आपल्या दैनंदिन आस्थापनेच्या कामकाजापेक्षा निवडणुकीचे काम थोडेसे वेगळे असले, तरी सकारात्मक राहून, प्रामाणिकपणे कर्तव्य पार पाडावे. निवडणुकीची प्रत्येक जबाबदारी समजून व दक्षतापूर्वक पार पाडावी. निवडणूक आयोगाच्या आदेश व सूचनांचे तंतोतंत पालन करावे. निवडणूकपूर्व प्रशिक्षण काळजीपूर्वक समजून घ्यावे, कामात हयगय करू नये, अशा सूचना सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा शहाद्याचे प्रांताधिकारी सुभाष दळवी यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना दिल्या. (Nandurbar Lok Sabha Election District Magistrate Dalvi statement of Understand every responsibility of election )

लोकसभा निवडणुकीचा पार्श्वभूमीवर शहादा विधानसभा क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे शहरातील शेठ व्ही. के. शहा विद्यामंदिर व बायपास रस्त्यावरील एस. कुमार लॉन्स या ठिकाणी दोन सत्रांत कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण वर्ग झाले. त्या वेळी निवडणूक कामासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांना कार्यशाळेत मार्गदर्शन करताना श्री. दळवी बोलत होते. या वेळी अतिरिक्त निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार दीपक गिरासे, दीपक धिवरे उपस्थित होते.

या वेळी ४७४ मतदान केंद्राध्यक्ष व ५०० इतर मतदान अधिकारी यांना शेठ व्ही. के. शहा विद्यालयात हॅन्डसोन ट्रेनिंग देण्यात आले. या वेळी उपस्थित कर्मचाऱ्यांना ईव्हीएमच्या प्रात्यक्षिकासह नियमांची माहिती प्रशिक्षणाद्वारे कर्मचाऱ्यांना देण्यात आली. मतदान प्रक्रियेची नियमावली घ्यावयाची खबरदारी, ईव्हीएम हाताळण्याची पद्धत याची सविस्तर माहिती स्लाइड शोद्वारे व प्रत्यक्ष मशिनचे प्रात्यक्षिक दाखवून प्रशिक्षण दिले. (latest marathi news)

Assistant Election Returning Officer Subhash Dalvi guiding the employees appointed for the Lok Sabha elections through a slide show in the workshop.
Nandurbar Lok Sabha Constituency : जागा वाटपाचा तिढा सुटेना, मित्र पक्षाचे पदाधिकारी कामाला लागेना

या वेळी श्री. दळवी म्हणाले, की मतदानाच्या दिवशी प्रत्येक कर्मचाऱ्याने आपापले कर्तव्य चोखपणे काळजीपूर्वक पार पाडणे आवश्यक आहे.मतदान यंत्रांची चाचणी करून उमेदवार किंवा प्रतिनिधींसमोर मॉकपोल झाल्यावर प्रत्यक्ष मतदान वेळेत सुरू करावे. मतदान साहित्य ताब्यात घेतल्यानंतर काळजीपूर्वक साहित्य तपासून घेणे, मशिन सील करताना टॅग, सील, एबीसीडी पट्टी विविध साहित्य व्यवस्थित लावावे.

सकाळी मॉकपोल करून घ्यावे. कर्मचाऱ्यांनी आपले काम, कर्तव्य चोखपणे पार पाडावे. आचारसंहितेचा भंग होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन केले. या वेळी नायब तहसीलदार विजय साळवे, शैलेंद्र गवते, रतनसिंग राजपूत, लक्ष्मण गायकवाड यांसह तळोदा व शहादा तालुक्यातील सर्व तहसील कार्यालयांचे कर्मचारी मंडळाधिकारी व तलाठी उपस्थित होते.

Assistant Election Returning Officer Subhash Dalvi guiding the employees appointed for the Lok Sabha elections through a slide show in the workshop.
Nandurbar Lok Sabha Election : नंदुरबारमध्ये काँग्रेसच्या गुगलीने अनेकांना धक्का!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com