
नंदुरबार : महायुती सरकारने भ्रष्टाचाराचा कळस गाठला आहे. कर्नाटकतील भाजपा सरकार ४० टक्के कमिशनवाले होते, महायुती सरकार तर त्यापुढे गेले आहे, भ्रष्टाचाराचे नवनवे विक्रमच या सरकारने रचले आहेत. महाराष्ट्राच्या डोक्यावर कर्ज लादून महागाई वाढवली आहे, महाराष्ट्र हे सर्वात महागडे राज्य अशी ओळख निर्माण झाली आहे.
महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी दिल्लीसमोर व गुजरात लॉबीसमोर झुकणारे भाजप युती सरकार उखडून फेका, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले. (Criticism of Congress State President Patole on mahayuti)