Nandurbar News : तुळाजा धरणाच्या कामामुळे पाणी पातळीत वाढ होणार : आमदार राजेश पाडवी

Nandurbar : तुळाजा धरणाच्या साठवण क्षमतेत वाढ होऊन परिसरातील पाण्याच्या पातळीतही भविष्यात वाढ होणार असल्याचे प्रतिपादन आमदार राजेश पाडवी यांनी सांगितले.
MLA Rajesh Padvi and office bearers during Bhoomi Puja for various development works in G.P. group.
MLA Rajesh Padvi and office bearers during Bhoomi Puja for various development works in G.P. group.esakal

Nandurbar News : मृदा व जलसंधारण विभागातंर्गत धरणाची पुनर्रचना व धरण परिसरातील विविध विकास काम करण्यासाठी निधी उपलब्ध झाला असून यामुळे तुळाजा धरणाच्या साठवण क्षमतेत वाढ होऊन परिसरातील पाण्याच्या पातळीतही भविष्यात वाढ होणार असल्याचे प्रतिपादन आमदार राजेश पाडवी यांनी सांगितले. (Nandurbar MLA Rajesh Padvi statement Water level will increase due to Tulja dam work)

जिल्हा परीषद गटातील सिंगसपूर (तुळाजा) गावाच्या बिलीचापाडा (लपा) धरणाची दुरुस्ती करणे, पाटबंधारे दुरुस्त करणे, धरणातील पाणी साठवण्याची क्षमता तपासणे व वाढवणे, परिसरातील विहीर दुरुस्ती करणे, धरणाचे खोलीकरण करणे अशा विविध प्रकारच्या कामाचे भूमिपूजन श्री. पाडवी यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.

यावेळी जिल्हा परिषद सदस्या सुनीता पवार, भाजप तालुकाध्यक्ष प्रकाश वळवी, पंचायत समिती उपसभापती विजयसिंग राणा. (latest marathi news)

MLA Rajesh Padvi and office bearers during Bhoomi Puja for various development works in G.P. group.
Nandurbar News : अंकलेश्वर-बऱ्हाणपूर महामार्ग कामाला गती; चौपदरीकरणासाठी जमीन अधिग्रहणाची अधिसूचना प्रसिद्ध

बोरदचे रवींद्र भिलाव, सोमावल सरपंच गुड्डू पाडवी, मालदाचे गोपी पावरा, भाजप जिल्हा महामंत्री बळीराम पाडवी, विधानसभा निवडणूक प्रभारी कैलास चौधरी, विधानसभा प्रभारी नारायण ठाकरे, ग्रामपंचायत सदस्य दिलीप पवार.

बलंग माळी, किसन मावची, डोंगरसिंग रामचंद्र ठाकरे, माजी पंचायत समिती सदस्य सीताराम रहासे, किरण सूर्यवंशी तसेच परिसरातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

MLA Rajesh Padvi and office bearers during Bhoomi Puja for various development works in G.P. group.
Nandurbar News : आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना मिळणार ‘स्मार्ट एज्युकेशन’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com