
नंदुरबार : नंदुरबारच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास क्रांतिवीर खाज्या नाईक यांचे नाव देण्याची शिफारस करणारा ठराव जिल्हा नियोजन समितीने केला असून, शासनस्तरावर त्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार आहे. जिल्ह्यातील एकही नागरिक, शेतकरी कुठल्याही आपत्तीच्या भरपाईपासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही गुरुवारी (ता. १५) पालकमंत्री तथा आपत्ती नियंत्रण, मदत पुनर्वसनमंत्री अनिल पाटील यांनी दिली. (Anil Patil statement at Main Events on Independence Day in nandurbar)