खाकीतील माणुसकीची प्रचिती; नंदुरबारच्या पोलिसांचे दिव्यांगाला बळ

पोलिसांबद्दलच सर्वसामान्यांच्या मनात फारसे चांगले मत नसते, परंतु नंदुरबार पोलिसांनी मात्र याला वेळोवेळी छेद दिला आहे.
Police
Policeesakal

नंदुरबार : गुन्हेगारांना पकडणारे व कायद्याचा धाक असलेल्या पोलिसांबद्दलच सर्वसामान्यांच्या मनात फारसे चांगले मत नसते, परंतु नंदुरबार पोलिसांनी मात्र याला वेळोवेळी छेद दिला आहे.त्याचा प्रत्यय आज पुन्हा नंदुरबारकरांना आला. तो म्हणजे पोलिस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी पोलिस दलातर्फे एका दिव्यांग तरुणाला मदतीचे बळ देऊन.

शहरातील श्रेयस दिलीप नांदेडकर (वय ३५) शिक्षण बारावीपर्यंत तो जन्मतःच संपूर्ण दिव्यांग! हात व पाय ठार लुळे. असून नसल्यासारखेच. उभा राहता येत नसल्याने सतत बसूनच रहावे लागते. दुसऱ्यानेच उचलून न्यावे लागते. बोलताना अडखळत बोलतो. परिस्थिती अत्यंत गरीब. नंदुरबार पोलिसांच्या भाड्याच्या गाळ्यात त्याचे वडील दिलीप नांदेडकर झेरॅाक्स मशिनवर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचे. श्रेयसच्या एका हाताची थोडीशी हालचाल होते, परिस्थितीला शरण न जाता याच एका हाताने तो वडिलांना झेरॅाक्स काढायला परवापर्यंत मदत करायचा.

Police
आचारसंहिता लागण्यापूर्वी परीक्षा घ्या; बेरोजगारांची आर्त हाक

वडीलांचे अटॅकमुळे निधन

१४ एप्रिलला श्रेयसचे वडील हार्ट अटॅकने गेले आणि दिव्यांग श्रेयसच्या कुटुंबावर नियतीने दुसरा निर्दयी आघात केला. स्वतःलाच उभे राहता येत नाही तेथे या वयात आईचा सांभाळ कसा करायचा या विचारांनी तो सैरभैर झाला. आतापर्यंत वडील त्याला दुकानापर्यंत पाठीवर उचलून आणायचे, आता पुढे काय? जीवनाची लढायचे तर आहेच पण कसे? दिलीप नांदेडकरांचा संसार त्यांच्या पश्चात उघड्यावर पडला.

काही नाही..लढणार

ही बातमी पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांना कळली. त्यांनी श्रेयसला बोलावून घेतले. आईसह तो कार्यालयात आला. पुढे काय ? विचारले तर तो म्हणाला ‘काही नाही..लढणार!’ मग काय पोलिस अधीक्षक यांच्या एका हाकेसरशी नंदुरबार पोलिसांची टीम कामाला लागली. पुन्हा एक मोडू पाहणारा संसार उभा करायचा असा विचार पुढे आला. पोलिस अधीक्षकांसह अपर अधीक्षक विजय पवार, पो. नि. कळमकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी निधी जमा केला. तब्बल ६३ हजार रुपये जमा झाले. या रकमेचा चेक थरथरत्या हातांनी स्वीकारत श्रेयसने नंदुरबार पोलिसांचे आभार मानले. रकमेतून आता श्रेयस स्व:ताच्या तीनचाकी बाईकवर झेरॅाक्सच्या दुकानात जाऊ शकेल. एका दिव्यांगास नियतीने लाथाडले पण पोलिसांनी आपलेसे केले.मागेही एका गरीब वृद्धास मदतीचा हात देऊन नंदुरबार पोलीसांनी समाजापुढे एक आदर्श घालून दिला होता.

जिल्हा पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी पदभार घेतल्यापासून निराधारांना किंवा गोर गरिबांना मदत करण्याची पहिली वेळ नव्हे, तर अशा अनेक घटना आहेत. डामरखेडा येथील वृद्धाची चोरीची रक्कम परत करणे असो, कोरोना काळात मृत्यू झालेल्या पोलिस कर्मचाऱ्यांचा कुटुंबीयांसोबतच दिवाळी असो की, त्यांना आर्थिक मदत व वर्षानुवर्षे रखडलेल्या पोलिसांच्या पदोन्नतीचा प्रश्‍न असो, ते त्यांनी मार्गी लावले. त्यांचा कार्यामुळे जिल्ह्याचा नाव देशाचा नकाशावर झळकू लागले आहे. त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

Police
उन्हाळी सुटीतही भरली क्षमता आणि कौशल्ये विकसित करणारी शाळा

''पोलिस अधिक्षक कार्यालयाचा कॉम्प्लेक्समध्ये दिलीप नांदेडकर यांचे झेरॉक्सचे दुकान होते.त्यांचा नेहमी पोलिस अधिकारी -कर्मचारींशी संबंध होता. त्यांचा अचानक मृत्यू झाल्याचे कळले.त्यांचा मुलगा श्रेयस ची शारीरिक स्थिती खुपच गंभीर आहे. आधाराशिवाय तो उभाही राहू शकत नाही.त्यामुळे जीवनात उभा राहील कसा ? हा प्रश्‍न आम्हाला पडला.काही तरी त्याचसाठी करावे, म्हणून पोलिस दलातर्फे निधी जमा करून त्याला जगण्यासाठी बळ देण्याचे काम केले.'' - पी. आर. पाटील, पोलिस अधीक्षक, नंदुरबार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com