नंदुरबार- क्रीडा क्लबच्या नावाखाली जुगाराचा अड्डा चालविणाऱ्या दोन ठिकाणी नंदुरबार पोलिसांनी कारवाई केली. त्यात अनेक प्रतिष्ठित पोलिसांच्या जाळ्यात अडकले. त्यांच्याकडून एक लाख ३० हजार ६४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. .मिळालेल्या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अमितकुमार मनेळ व पथकांनी परदेशीपुरा परिसरातील नवीन पालिकेच्या पाठीमागील क्रीडा भवनात क्रीडा क्लबवर छापा टाकला. महेंद्र वासुदेव मराठे (वय ४६, रा. महाराष्ट्र व्यायामशाळा, नंदुरबार) क्रीडा क्लबच्या अटी व शर्तींचे उल्लंघन करून तीन पत्त्यांचा जुगार चालविताना आढळून आला. .शंकर गवळी (२५, देसाईपुरा), सुशील तांबोळी (४७, गांधीनगर), हितेश गायकवाड (२५, परदेशीपुरा), पराग शहा (६१, गिरीविहार गेट सोसायटी), रमेश मोहनाने (५८, शिक्षक कॉलनी, धडगाव) मुकेश ठक्कर (६१, नागाईनगर), महेंद्र चौधरी (४०, जगतापवाडी), कल्पेश चौधरी (३०, गवळीवाडा), विजय भिल (३२, लहान शहादा), योगेश खाडे (३५, आष्टे), सागर बर्डे (२८, तळोदा), किरण पाटील (३०, रायसिंगपुरा) जुगार खेळताना मिळून आले. ७० हजार ३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याबाबत नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे..गोकुळ लस्सी पाठीमागील वसंत चौधरी यांच्या बिल्डिंगमध्ये असलेल्या नंदुरबार सोशल ट्रस्ट क्लबवर पोलिसांनी छापा टाकला. तेथे किशोर दादलाणी जुगार खेळविताना आढळून आला. दुर्गेश वैष्णव (५४, रा. परदेशीपुरा), शरद चौधरी (५२, भोई गल्ली), सतीश फटकाळ (५३, चौधरी गल्ली), राजेंद्र भोई, (३४, संजयनगर), दीनानाथ तिरंगे (२२, कंजरवाडा), मुकेश पाटील (२६, लक्ष्मीनगर), वसंत पाटील (६२, कोळदा), कुणाल पाटील (३२, एकतानगर), पिंजारा हाफिजुल्ला खान सलीम खान (५१, पटेलवाडी), इफ्तेखार शेख कासीम पिंजारी (५१, एम.के.नगर), राहुल सकट (३६, भीमसिंगनगर), शांतिलाल चौधरी (५८, चौधरी गल्ली), प्रशांत चौधरी (४५, देसाईपुरा), जय राजपाल (२४, जुनी सिंधी कॉलनी), लखन जामनानी (५२, जुनी सिंधी कॉलनी) जुगार खेळताना आढळून आले. .पोलिसांनी ६० हजार ६१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याबाबत नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक श्रवण दत्त एस., अपर अधीक्षक आशित कांबळे, उपअधीक्षक संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, शहर ठाण्याचे पोलिस निरीक्षक अमितकुमार मनेळ, उपनिरीक्षक मुकेश पवार, विकास गुंजाळ आदींनी केली..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.