Nandurbar Vidhan Sabha Election esakal
उत्तर महाराष्ट्र
Nandurbar Vidhan Sabha Election : शह-काटशाहाचे रंगतेय राजकारण
Latest Vidhan Sabha Election News : नंदुरबार जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत शह-काटशहाचे राजकारण रंगले असून, चारही मतदारसंघांत चुरशीच्या लढती होणार हे माघारीअंती स्पष्ट झाले आहे.
Nandurbar Vidhan Sabha Election : नंदुरबार जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत शह-काटशहाचे राजकारण रंगले असून, चारही मतदारसंघांत चुरशीच्या लढती होणार हे माघारीअंती स्पष्ट झाले आहे. या चुरशीच्या लढतीत प्रत्येक जण आपले काम व कार्य बिंबविण्याचा प्रयत्न करणार आहे, मात्र मतदाता कोणाला झुकते माप देतात, हे निवडणुकीतूनच कळेल. प्रत्येक उमेदवार निवडणूक मीच जिंकणार या आविर्भावाने प्रचाराला लागल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील चार जागांसाठी ३१ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. उमेदवारांची संख्या बहुसंख्य आहे. मात्र खरी लढत दिग्गज उमेदवारांमध्येच होणार आहे. (politics of Shah Kat Shah have played out in elections and it has become clear at end of retreat that there will be tough contest in four constituencies )

