SAKAL Exclusive: सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणाऱ्या शहादा बसस्थानकाची अवस्था! पाणी साचल्याने तलावाचे स्वरूप

Dhule News : बसस्थानक आवार व ट्रॅव्हल्स कंपन्या बसस्थानकाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने तलावाचे स्वरूप आले आहे. परिणामी साचलेल्या पाण्यामुळे बसपर्यंत पोचण्यासाठी प्रवाशांना मोठी कसरत करावी लागते.
Water puddles in the bus stand area
Water puddles in the bus stand areaesakal

शहादा : राज्य परिवहन महामंडळाच्या येथील आगाराचा प्रवासी वाहतूक करून उत्पन्न मिळवून देण्यात जिल्ह्यात प्रथम क्रमांक लागतो, तर काही खासगी ट्रॅव्हल्स कंपन्याही प्रवाशांकडून वारेमाप भाडे घेतात. पण या दोन्ही ठिकाणी प्रवाशांच्या आरोग्य, सोयीकडे लक्ष देण्यास त्यांना वेळ नाही.

पावसाळ्यात बस व ट्रॅव्हल्स बस कशी भरली जाईल, याकडे त्यांचे लक्ष असते. पण बसस्थानक आवार व ट्रॅव्हल्स कंपन्या बसस्थानकाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने तलावाचे स्वरूप आले आहे. परिणामी साचलेल्या पाण्यामुळे बसपर्यंत पोचण्यासाठी प्रवाशांना मोठी कसरत करावी लागते. (nandurbar Shahada bus station appearance of lake of contaminated water)

येथील बसस्थानक आवारातून पहाटे पाचपासून रात्री दहापर्यंत लांब पल्ल्याच्या तसेच ग्रामीण भागात दैनंदिन शेकडो बस धावतात. त्यातून प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांच्या सोयी व आरोग्याकडे दुर्लक्ष होते. पावसाळ्यात बसस्थानक आवारात मोठ्या प्रमाणात पाणी साचते. प्रवाशांना त्यातून जाणे अवघड होते. प्रवासी सूचना खिडकीपर्यंत जाण्यासही रस्ता उरलेला नाही. सर्वत्र पाणी साचल्याने डासांसाठी ही स्थिती पोषक आहे. दुर्गंधीही पसरली आहे. त्यामुळे बससाठी

थांबणाऱ्या प्रवाशांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. शेकडो शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी बसनेच प्रवास करतात. आगारप्रमुख व वरिष्ठ अधिकारी फक्त आगाराला जास्तीत जास्त उत्पन्न कसे मिळेल, यावरच लक्ष केंद्रित करतात. प्रवाशांच्या गैरसोयींकडे मात्र अनेक वर्षांपासून दुर्लक्ष केल्याचा आरोप प्रवाशांकडून होत आहे. प्रशासनानेही याप्रश्नी लक्ष घालण्याची मागणी होत आहे.

उड्या मारत मारत गाठावी लागते बस

बसस्थानक आवारात ठिकठिकाणी पाण्याचे डबके साचले आहे. सकाळी प्रवासी ग्रामीण भागासह लांबपल्ल्याच्या ठिकाणी जाण्यासाठी येतात; परंतु साचलेल्या पाण्यामुळे त्यांना चौकशी खिडकीपर्यंत जाता येत नाही. बस केव्हा लागेल, याची चौकशी करता येत नाही. अनेक वेळा बस उभी असते, त्यांना पाट्या नसल्याने लांबून प्रवाशांना ती बस कुठे जात आहे हे कळत नाही. (latest marathi news)

Water puddles in the bus stand area
Dhule News: ‘जवाहर’ पॅनलचा दणदणीत विजय! खरेदी-विक्री संघ निवडणूकीत प्रतिस्पर्धी भाजपच्या पॅनलचा धुव्वा, डिपॉझिटही जप्त

काही वाहक, चालक प्रवाशांना माहिती देण्यापूर्वीच स्थानकातून बस मार्गस्थ करतात. येथील आगारात प्रवाशांच्या सोयींकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप प्रवासी वर्गाकडून होत आहे. शहरात प्रवाशांच्या सोयीकडे लक्ष देण्यासाठी प्रवासी संघटना असून, त्यांच्या माध्यमातून प्रवाशांना न्याय मिळवून दिला जाईल, अशी अपेक्षा प्रवासी वर्गाकडून होत आहे. दरम्यान, बसस्थानकात साचलेल्या पाण्यामुळे उड्या मारत मारत बसचे द्वार प्रवाशांना गाठावे लागते.

"पावसाळा सुरू झाला, की बसस्थानक आवारात येताना तेथील साचलेल्या पाण्यामुळे प्रवाशांच्या अंगावर काटे येतात. पाण्याचे मोठमोठे डबके साचल्याने वयोवृद्ध प्रवासी, विद्यार्थी बसपर्यंत पोचताना मोठी कसरत करावी लागते. बससाठी ताटकळत कुठेतरी उभे राहावे लागते. काही बसला फलक नसल्याने कोणती बस कुठे जात आहे, हेच कळत नाही. अशा वेळी प्रवासी कसे जाणार, आगारप्रमुखांनी समस्यांची तत्काळ दखल घ्यावी."- तुषार गोसावी, प्रवासी, वडाळी

ट्रॅव्हल कंपन्यांकडूनही प्रवाशांकडे दुर्लक्ष

शहरात दहापेक्षा जास्त खासगी ट्रॅव्हल कंपन्यांच्या बसमधून मुंबई, पुण्यासह मोठ्या शहरांकरिता दररोज सायंकाळी येथील पालिकेच्या नियोजित ट्रक टर्मिनलच्या मैदानातून प्रवासी मार्गस्थ होतात. दररोज सायंकाळी सहाला ज्या ठिकाणी ट्रॅव्हल बस उभ्या असतात तेथेही सर्वत्र पाण्याचे मोठे तळेच साचले आहे.

त्याच पाण्यातून प्रवाशांना खासगी बसमध्ये बसावे लागते. एवढेच नव्हे तर प्रवासी तास तासभर बाहेर किंवा बसमध्ये बसल्यानंतर साचलेल्या पाण्यामुळे कुजलेला कचरा, वनस्पतींमुळे पसरणारी दुर्गंधी आरोग्याला घातक आहे. प्रवाशांचे आरोग्य खराब होऊ नये यासाठी खासगी ट्रॅव्हल कंपन्यांनी साचलेल्या पाण्याच्या डबक्यांमध्ये मुरूम टाकून प्रवाशांसाठी सुविधा करणे आवश्यक आहे.

Water puddles in the bus stand area
Dhule: पेपर तपासणीत गलथान कारभार कायम! युवासेनेसह विद्यार्थ्यांचा आरोप; विद्यापीठावर मोर्चा, कारभार सुधारा अन्यथा तीव्र आंदोलन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com