नंदुरबार- राज्याचे कृषिमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी शनिवारी (ता. २६) शनिमांडळ येथील शनिदेवाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेत अभिषेक, विशेष पूजाअर्चा केली. सध्या विविध कारणांमुळे राजकीय संकटात सापडलेल्या कोकाटेंनी आपल्यावरील व लोकांवरील साडेसातीचे संकट दूर व्हावे, यासाठी शनिदेवाला प्रार्थना केली. त्यांच्या या नंदुरबार दौऱ्याची आणि शनिपूजेची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.