Nandurbar News : तळोद्यात उदमांजराच्या दर्शनाने शेतकऱ्यांना दिलासा; जैवविविधता टिकावी ही प्राणीप्रेमी शेतकऱ्यांची अपेक्षा

Nandurbar : नंदुरबारकडे जाणाऱ्या हातोडा रस्त्यावरील आग्यावड शिवारात रात्रीच्या सुमारास शेतात कूपनलिकेचा वीजपुरवठा सुरू करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांना सुंदर उदमांजर दृष्टीस पडले.
A beautiful wild cat found by farmers in the field.
A beautiful wild cat found by farmers in the field.esakal

Nandurbar News : नंदुरबारकडे जाणाऱ्या हातोडा रस्त्यावरील आग्यावड शिवारात रात्रीच्या सुमारास शेतात कूपनलिकेचा वीजपुरवठा सुरू करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांना सुंदर उदमांजर दृष्टीस पडले. त्या उदमांजराच्या दर्शनाने प्राणीप्रेमी शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला. त्या उदमांजराचे वावरणे व त्याची चाल लक्ष वेधत होती, तर शेपटावरील काळे पट्टे सुंदरता वाढवत असल्याचे त्यांनी सांगितले. (sight of Udmanjar in Taloda brings relief farmers in taloda )

त्यामुळे तालुक्यातील जैवविविधता समृद्ध असल्याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला असून, जैवविविधता टिकविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली. तळोदा तालुक्यात अनेक प्राण्यांचा अधिवास आहे. बिबटे, कोल्हे, लांडगे, तरस, उदमांजर, रानमांजर माकडे, अस्वल अशा प्राण्यांनी तालुका समृद्ध आहे. तर दुसरीकडे वनपिंगळा, मोर, कोतवाल, पोपट, बगळा व अनेक विविध दुर्मिळ पक्षी तालुक्यात आढळतात.

त्यांच्या पाऊलखुणा कुठे ना कुठे दररोज शेतकऱ्यांना दृष्टीस पडतात. त्यामुळे तालुक्यातील जैवविविधता नेहमीच चर्चेचा विषय असतो. त्यात दररोज शेतकऱ्यांना दिसणारा बिबट्या तर नेहमीचाच झाला आहे. असे असताना शेतकऱ्यांना अनेक सुंदर पक्षी व प्राण्यांचेही दर्शन नेहमीच होत असते. त्यात बुधवारी रात्री आग्यावड शिवारात पिकांना पाणी देण्यासाठी गेलेले शेतकरी मुकेश महाजन, विनोद सूर्यवंशी यांना उदमांजर हा प्राणी दिसून आला. (latest marathi news)

A beautiful wild cat found by farmers in the field.
Nandurbar News : खडसे भाजपमध्ये गेले तरी मी पवारांसोबतच राहणार : उदेसिंग पाडवी

त्याच्या शरीरावर शेपटीपर्यंत काळे पट्टे होते. दुचाकीच्या प्रकाशाच्या उजेडात ते पुढे पुढे जात होते. त्याला पाहून शेतकऱ्यांना आनंद झाला. तळोदा तालुक्यात समृद्ध जैवविविधता टिकून असल्याचा पुरावा त्यांना मिळाला. तसे पाहता तालुक्यात झाडांची संख्या कमी होत आहे. जंगल नष्ट होण्याच्या मार्गावर असताना प्राणी शेतशिवारात येत असल्याने आता शेतशिवारातच प्राण्यांचा अधिवास वाढला आहे.

त्यामुळे आहे ते जंगल टिकविणे व असलेली जैवविविधता टिकविणे व झाडाचे संरक्षण करून संवर्धन करणे सर्वांचेच कर्तव्य बनल्याचे बोलले जात आहे. त्यात सुंदर उदमांजराचे दर्शन शेतकऱ्यांच्या मनाला दिलासा देऊन गेले.

A beautiful wild cat found by farmers in the field.
Nandurbar News : पळसाच्या पानांच्या पत्रावळी हद्दपार; प्लॅस्टिक पत्रावळींनी घेतली जागा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com