Nandurbar Summer Heat : उन्हात जाताय..? काळजी घ्या..! जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे नागरिकांना आवाहन

Nandurbar News : उष्माघाताचा विचार करताना तापमानाव्यतिरिक्त हवेतील आर्द्रता, धुळीचे कण, हवेचे प्रदूषण यांचाही परिणाम होत असतो.
Summer Heat
Summer Heatesakal

तळोदा : वाढत्या तापमानामुळे सुरू असलेल्या उन्हाळी हंगामात उष्माघाताने मानव, पशू, प्राणी व शेती पिकांवर होणारे दुष्परिणाम टाळण्याच्या दृष्टीने शासनाच्या विभागांनी कार्यवाही करावी व उष्माघाताचे दुष्परिणाम टाळावेत, तसेच नागरिकांनीही उन्हात जाताना काळजी घ्यावी व सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण नंदुरबार प्रशासनाने केले आहे. (Nandurbar Summer Heat marathi news)

जिल्ह्यात साधारण १ मार्च ते १५ जून या कालावधीत उन्हाळी हंगामातील उष्ण लाट असते. त्यामुळे उष्माघाताचा परिणाम मानवावर तसेच पशु-प्राण्यांवर तसेच शेती पिकांवरदेखील होत असतो. वाढत्या तापमानामुळे नंदुरबार जिल्हादेखील उष्मालाट प्रवणक्षेत्र म्हणून ओळखला जातो.

त्यामुळे विशेषतः झोपडपट्टीमध्ये राहणारे, रस्त्याशेजारील अथवा फिरते विक्रेते, बसस्थानक, रेल्वेस्थानक, यात्रेची ठिकाणे, विविध धार्मिक स्थळे, विवाह सोहळे, बाजार समितीत काम करणारे, नियमित बाजार अथवा आठवडेबाजारातील विक्रेते, तेथे भेट देणारे वयोवृद्ध, लहान मुले, महिला यांच्यावर उष्णतेचा परिणाम दिसून येतो.

उष्माघाताचा विचार करताना तापमानाव्यतिरिक्त हवेतील आर्द्रता, धुळीचे कण, हवेचे प्रदूषण यांचाही परिणाम होत असतो. या सर्व बाबी विचारात घेऊन जिल्ह्यातील शासनाच्या विभागांनी भौगोलिक व वातावरणीय बाबींचा विचार करावा व त्याबाबतचे नियोजन करावे, असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने कळविले आहे.

Summer Heat
Jalgaon Summer Heat : सूर्यनारायण तळपले; उन्हाचे चटके असह्य

उन्हाळ्यामध्ये घ्यावयाची काळजी

-पुरेसे पाणी प्यावे. तहान लागली नसतानादेखील दर अर्धा तासाच्या फरकाने पाणी प्यावे.

-घराबाहेर पडताना डोके झाकण्यासाठी छत्री अथवा टोपीचा वापर करावा.

-दुपारी बारा ते तीनदरम्यान घराबाहेर जाणे टाळावे. सूर्यप्रकाशापासून वाचण्यासाठी घरातील पडदे आणि झडपांच्या वापर करावा.

-उष्णतेच्या लाटेच्या माहितीसाठी रेडिओ, टीव्ही किंवा वर्तमानपत्रातील माहितीचा वापर करावा.

-हलके, पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावेत.

-प्रवासात पिण्याचे पाणी सोबत ठेवावे.

-अशक्तपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम इत्यादी उन्हाच्या झटका बसण्याची चिन्हे ओळखावीत व चक्कर येत असल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

-जनावरांना छावणीत ठेवावे तसेच त्यांना पुरेसे पाणी पिण्यास द्यावे.

-सूर्यप्रकाशाचा थेट संबंध टाळण्यासाठी कामगारांना सूचित करावे.-गर्भवती आणि आजारी कामगारांची अधिक काळजी घ्यावी. (latest marathi news)

Summer Heat
Summer : वाढत्या उन्हापासून सावधान! उष्माघाताचा होऊ शकतो त्रास

हे करू नका

-उन्हात अति कष्टाची कामे करू नका.

-दारू, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड थंड पेय घेऊ नका. दुपारी बारा ते तीनदरम्यान घराबाहेर जाणे टाळा.

-उच्च प्रथिनयुक्त आणि शिळे अन्न खाऊ नका.-लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेवू नका.

-गडद घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळा.

-बाहेर तापमान जास्त असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळा. -उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळा. अशा प्रकारच्या सूचना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तथा जिल्हा प्रशासनाने नागरिकांना दिल्या आहेत.

उष्णतेच्या लाटेची लक्षणे

तापमानाच्या निकषानुसार सलग दोन दिवस डोंगरी भागात ३० डिग्री, समुद्रकिनारी पट्ट्यात ३७ डिग्री व समतल भूभागात ४० डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानाची नोंद होणे किंवा सलग दोन दिवस हंगामातील सामान्य तापमानापेक्षा ४.५ डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानाची वाढ होणे यापैकी कोणतीही एक नोंद आढळल्यास या भागांमध्ये उष्णतेची लाट आहे असे समजण्यात येते.

Summer Heat
Summer Heat : वाढत्या उष्म्यामुळे पालिका रुग्णालयांमध्ये कक्ष; शहरात तापाचे साडेतीन हजार रुग्ण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com