नेहरु अन्‌ गांधीजींचे आवडते शिष्य डॉ. वासुदेव गोसावी

Live Photo
Live Photo

नाशिक ः सातपूर सोडल्यानंतर पाच किलोमीटर अंतरावरील बेलगाव ढगा. 94 वर्षीय डॉ. वासुदेव गोसावी हे सत्तर वर्षांपासून गावात निवास करताहेत. त्यांचे मूळगाव सेवाग्राम. महात्मा गांधींचे आश्रम. डॉक्‍टर विद्यार्थी दशेत महात्मा गांधी यांच्यासमवेत भजन म्हणायचे. पंडीत नेहरु आणि गांधीजी त्यांना नावाने बोलवत असत. 

आश्रमात येणाऱ्यांना पाणी देण्याची सेवा ते बजावत. त्यात जमनालाल बजाज, जयप्रकाश नारायण आदींचा समावेश होता. इंग्रज गावातून तोफांचा सराव करायचे अशी आठवण ग्रामस्थ सांगतात. 

स्वातंत्र्यपूर्व आठवणींचा खजिना
महात्मा गांधी यांनी डॉक्‍टरांना कराची आणि दिल्ली येथे शिक्षणासाठी पाठविले. शिक्षण घेतल्यानंतर नाशिकमध्ये येऊन होमिओपॅथीचे शिक्षण घेतले. नोकरीसाठी ते इथेच थांबले. निवासासाठी त्यांनी बेलगाव ढगा गावाची निवड केली. त्यावेळीपासून ते इथेच राहतात. स्वातंत्र्यपूर्व अनेक आठवणींचा संग्रह त्यांच्याकडे आहे. 

स्वातंत्र्यसैनिकांना मदत करतात म्हणून त्यांना ब्रिटीश आले होते. पण ब्रिटीश पोलिसांना त्यांनी हुलकावणी दिली. त्यांनी ही माहिती कागदावर लिहून सांगितली. 
बेळगाव ढगा गाव साडेतीन हजार लोकवस्तीचे. राजवाडा, मातोश्रीनगर आणि त्र्यंबक विद्यामंदिर अशा तीन भागात आहे. तीन भागात असलेल्या विविध मंदिरांमध्ये शंकर, हनुमान,मरीआई आदी मंदिरांचा समावेश आहे. गावात पीरबाबांचा यात्रोत्सव होतो. त्यावेळी कुस्त्यांच्या दंगल होते. गावात अनेक ठिकाणी दगडी चिरा आहेत. तसेच इथे आठ वर्षांपासून हरिनाम सप्ताह होतोय. महिरावणीच्या पाझर तलावातून पिण्याचे पाणी गावाला पुरवले जाते. गावात सत्तरीतील अनेक मल्ल आहेत. संतू ढगे, सोनू गांगोडे आदींचा त्यात समावेश आहे. गावातील भजनी मंडळात धर्मा ढगे, पोपट मांडे, ज्ञानेश्‍वर मते, यशोदा ढगे, ज्योतीबाई बेंडकुळे, हौसाबाई रसाळ, सिंधूबाई ठाकरे, अमोल गवांदे आदींचा सहभाग असतो. 

"रिश्‍ते', "करिष्मा कुदरत का'चे चित्रीकरण 
अनिल कपूर आणि करिष्मा कपूरच्या "रिश्‍ते', धर्मेंद्र यांच्या "करिष्मा कुदरत का' या चित्रपटांचे चित्रीकरण गावाच्या शिवारात झाले आहे. गावच्या जंगलात पाचशेहून अधिक मोर आहेत. संतोषा डोंगराचा पर्यटन विकास झाल्यास मोरांचे संवर्धन होण्यास मदत होणार आहे. 1960 मधील शाळा गावात आहे. पूर्वी ब्रिटीश सैनिक संतोषा डोंगरावर तोफांचा सराव करत असे. गावातील अहिल्याबाई होळकरांच्या काळातील बारव सुस्थितीत आहे. गावात कुबेर चे मंदिर असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. मात्र ते आढळत नाही. मात्र "गुगल'वर "सर्च' केल्यावर मंदिर गावात असल्याचे दर्शवते. गावच्या पूर्वीच्या 16 एकरच्या गावठाणमध्ये अतिक्रमण झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्याचवेळी याठिकाणी आंतरराष्ट्रीय मैदान उभे राहू शकते, असा विश्‍वास ग्रामस्थांना वाटतोयं. 

गावाजवळच्या संतोषा डोंगर असून बाजूला मोठे जंगल आहे. जंगलात बिबटे, जंगली डुक्‍कर, कोल्हे, रानससे, तरस पाह्यला मिळतात. त्याचा पर्यटन क्षेत्र म्हणून विकास होण्यातून गावाला रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहेत. 
- दत्तू ढगे (ग्रामस्थ) 

स्वातंत्र्य लढा जवळून पाहिलेले डॉ. गोसावी सत्तर वर्षांपासून गावात राहतात. त्यांनी अनेक सामाजिक उपक्रमात सहभाग नोंदवला आहे. त्यांच्या आठवणी ऐकताना अंगावर शहारे उभे राहतात. आजही ते एकटे स्वतःच्या घरात राहतात. 
- मनोहर मांडे (ग्रामस्थ) 

ब्रिटीश सरकार असताना मी कुस्त्या खेळलेल्या आहेत. त्यावेळी जिल्ह्यातील नामांकित स्पर्धेत मी भाग घेतला आहे. गावात ब्रिटीश सैन्य तोफांचा सराव करण्यासाठी येत असे. त्यावेळी गावाला धर्मशाळेत स्थलांतरीत करत असत आणि आठवडाभरासाठी पाच रुपये दिले जायचे. 
- संतू ढगे (मल्ल)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com