उत्तर महाराष्ट्र
Samruddhi Mahamarg: हक्काच्या पाण्यासाठी सिन्नरचे शेतकरी करणार समृद्धीवर आंदोलन!
Latest Nashik News: मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर सोमवारी (ता.७) उपोषण आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
Sinnar Latest News: नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्याच्या सरहद्दीवर असणाऱ्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांना वणवण करावी लागत आहे. या भागात हक्काचे असलेले भोजापूर आणि निळवंडे धरणातील पूरपाणी अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने दुसरीकडे वळविण्यात आले आहे.
देवनदीचे पूर पाणी देखील नगर जिल्ह्यात जात आहे. हक्काच्या पाण्यासाठी पूर्व भागातील शेतकऱ्यांनी मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर सोमवारी (ता.७) उपोषण आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

