जळगाव: जिल्ह्यातील काही भागात, नाशिक जिल्ह्यात गिरणा नदी व पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस होत आहे. यामुळे गिरणा प्रकल्पात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात होत असून, प्रकल्प लवकरच ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे. जळगाव जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांपैकी सहा प्रकल्प पूर्ण भरले असून, बोरी प्रकल्प ९० टक्के भरला आहे. बोरी प्रकल्पातून रात्री दहाला ९०३ क्यूसेक विसर्ग सोडला आहे, असे गिरणा प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता विनोद पाटील यांनी सांगितले. गिरणा व बोरी नदीकाठच्या नागरिकांना सावधतेचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.