भावाने मारलेल्या दगडामुळे बहिणीला गमवावे लागले प्राण

संजीव निकम
सोमवार, 17 जुलै 2017

हातातील मोठा दगड बहिणीच्या दिशेने मारून फेकला राजुने फेकलेला दगड आरतीच्या हृदयाच्या बाजूला लागल्याने ती जागेवर कोसळली

नांदगाव : शेतात बहिणीला कामाला का आणले या कारणावरून भावाने मारलेल्या दगडाच्या मारामुळे बहिणीला प्राणाला मुकावे लागल्याची घटना आज सायंकाळी घडली . या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

याबाबत माहिती अशी की, आरती रंगनाथ मुकणे ही अलीकडेच काही दिवसांपूर्वी पुण्याहून आपल्या मोठ्या भावाकडे नांदगाव तालुक्यातील रणखेडा येथे आली होती. आज मोठ्या भावाने तिलामुळडोंगरीच्या ज्ञानेशवर नगर येथे लहान भावाकडे पाठविले होते. दुपारी आरती आई वडील व आपल्या भावजयसोबत बाजरी निंदण्यासाठी शेतात गेली होती. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास लहान भाऊ राजू हा शेतात गेला व आपल्या बहिणीला इकडे शेतात का आणले म्हणून बायकोला व आईला त्याने सुरवातीला मारहाण केली. त्यात त्याने हातातील मोठा दगड बहिणीच्या दिशेने मारून फेकला राजुने फेकलेला दगड आरतीच्या हृदयाच्या बाजूला लागल्याने ती जागेवर कोसळली. झालेला प्रकार बघून आरतीला घरी आणले असता डॉक्टरांना बोलावण्यात आले, मात्र तिचा मृत्यू झालेला होता.

बहिणीच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या भावाच्या शोधासाठी पोलीस निरीक्षक बशीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पदमणे, रमेश पवार, पंकज भदाणे आदींच्या पथकाने मुळ्डोंगरी व आजूबाजूचा परिसर शोधून काढला. मात्र रात्री उशिरापर्यंत राजू मुकणे आढळून आला नव्हता. काही दिवसांपूर्वी आरतीने पुण्यात विवाह केल्याची माहिती तपासात मिळून आली असली तरी अधिकृत दुजोरा मिळू शकला नव्हता. 

Web Title: Nashik news nandgaon brother throws stone kills sister

टॅग्स