Bank Election : जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी बॅंकेसाठी 10 अर्ज दाखल; 140 अर्जांची विक्री | 10 applications filed for District Government and Parishad Staff Bank election 140 applications sold nashik news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

election news

Bank Election : जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी बॅंकेसाठी 10 अर्ज दाखल; 140 अर्जांची विक्री

Bank Election : जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी बॅंकेची पंचवार्षिक निवडणूक प्रक्रीया सुरू झाली असून अर्ज दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी (ता.३०) दहा उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहे.

यात विद्यमान संचालक विजयकुमार हळदे, प्रशांत कवडे यांचा समावेश आहे. आतापर्यंत १४० अर्ज विक्री झाली आहे. (10 applications filed for District Government and Parishad Staff Bank election 140 applications sold nashik news)

जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी सहकारी बॅंकेची पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम २९ मे रोजी घोषित होऊन, त्याचदिवशी अर्ज दाखल करण्यास सुरवात झाली. पहिल्या दिवशी ७२ इच्छुकांनी उमेदवारी अर्जाची खरेदी केली मात्र, एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नव्हता.

मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरवात झाली असून एकूण १० उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. यात सर्वसाधारण गटातून प्रशांत कवडे, सतीश भोरकडे, गफुरबेग मिर्झा, प्रकाश थेटे, गणेश वाघ, विजयकुमार हळदे, तालुका प्रतिनिधी गटातून प्रकाश थेटे, इतर मागासवर्गीय गटातून प्रकाश थेटे, हळदे तर, विमुक्त जाती भटक्या जाती-जमाती गटातून संदीप दराडे यांनी अर्ज दाखल केले.

मंगळवारी दिवसभरात ६८ अर्जाची विक्री झाली आहे. त्यामुळे दोन दिवसात १४० अर्जाची विक्री झाली आहे. अर्ज दाखल करण्याची २ जून ही अंतिम मुदत आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

राजकीय हालचालींना वेग

अर्ज दाखल करण्यास शेवटचे तीन दिवस शिल्लक असल्याने सत्ताधाऱ्यांसह विरोधकांकडून हालचालींना वेग आला आहे. सत्ताधारी पॅनलकडून उमेदवारांची चाचपणी अंतिम टप्यांत आली असून अनेकांना ग्रीन सिग्नल देण्यात आल्याचे बोलले जात आहे.

सत्ताधाऱ्यांना शह देण्यासाठी विरोधकांनी कंबर कसली असून बैठकांचे सत्र सुरू केले आहे. दोन्ही गटाकडे इच्छुकांनी उमेदवारांची मागणी केली असल्याने त्यांची कसरत सुरू आहे. त्यामुळे दोन्ही पॅनलकडून इच्छुकांना अर्ज दाखल करा, असे सांगितले जात आहे.

टॅग्स :NashikBank Election