lock down nsk 1.jpg
lock down nsk 1.jpg

नाशिकमध्ये 10 दिवसांचा जनता कर्फ्यू! व्यापारी संघटनांच्या बैठकीत निर्णय

सोमवारपासून स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यू लावण्याचा निर्णय ऑनलाइन बैठकीत घेतला
Published on

नाशिक : शहरात कोरोना संसर्गाचा वेग झपाट्याने वाढत असून देशात नाशिक चौथ्या स्थानावर पोहोचले आहे. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शहरातील व्यापाऱ्यांनी सोमवार (ता. १९) पासून स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यू लावण्याचा निर्णय ऑनलाइन बैठकीत घेतला. यासंदर्भात पालकमंत्री छगन भुजबळ व जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्याकडे बैठकीचा अहवाल पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला.

शहरात कोरोना संसर्गाचा वेग झपाट्याने वाढत असताना मृत्यूच्या संख्येतही वाढ होत आहे. शासनाने संचारबंदी लागू केली असली तरी काही प्रमाणात शिथिलता दिली आहे. परंतु, नाशिककरांकडून शासनाच्या सौजन्याचादेखील गैरफायदा घेत रस्त्यावर गर्दी दिसून येत असल्याने उद्देश सफल होत नाही. सातपूर विभागात स्थानिक नागरिकांनी पुढाकार घेत जनता कर्फ्यू लावण्याचा एकमुखी निर्णय घेतला. मात्र, हा निर्णय सातपूर विभागापुरताच न घेता संपूर्ण शहरासाठी घेतला जावा या उद्देशाने महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्यावतीने मते जाणून घेण्यासाठी व्यापाऱ्यांची ऑनलाइन बैठक बोलाविण्यात आली होती. चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा व वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांनी भूमिका मांडली. प्रारंभी जनता कर्फ्यूसाठी पुढाकार घेतलेल्या नाशिक सिटीझन फोरमचे हेमंत राठी यांनी भूमिका मांडली. ते म्हणाले, गेल्यावर्षी शहरात कोरोना थोपविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना यश आले. मात्र यावर्षी परिस्थिती भयानक आहे. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राजकीय, सामाजिक, व्यावसायिक, व्यापार, उद्योग संघटनांना स्वयंस्फूर्तीने पुढे येण्याची गरज आहे. दहा दिवस स्वयंस्फूर्तीने बंद पाळून जनता कर्फ्यूत सहभागी व्हावे. ऑनलाइन चर्चेत क्रेडाईचे अध्यक्ष रवी महाजन, रसिक बोथरा, अनिल लोढा, राजेश मालपुरे, सोनल दगडे, आनंद सूर्यवंशी, श्रीधर व्यवहारे, भावेश माणिक, श्याम रमैय्या, राजेंद्र फड, स्वप्नील जैन, विलास शिरोरे आदी साठहून अधिक प्रतिनिधी सहभागी झाले होते.

lock down nsk 1.jpg
माणुसकीच नव्हे, संवेदनाही हरपल्या! बिलासाठी घेतल्या मृत महिलेच्या बांगड्या

कर्फ्यूसंदर्भात मांडलेली मते

- प्रशासनावरचा ताण वाढल्याने मदत करण्याची प्रत्येकाची जबाबदारी

- फक्त प्रशासनावर जबाबदारी टाकून चालणार नाही.

- कोरोना लढाईत प्रत्येकाचे योगदान महत्त्वाचे.

- कोरोना अटकावासाठी जे-जे आवश्यक आहे ते करावे.

- बंदमुळे आर्थिक झळ बसेल मात्र पर्याय नाही.

lock down nsk 1.jpg
धक्कादायक! नाशिकमध्ये अंतिम विधीसाठी सुध्दा पैशाची मागणी; VIDEO व्हायरल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com