
श्रावणात धावणार त्र्यंबकेश्वरसाठी Citylinc च्या 10 जादा बसेस
नाशिक : श्रावण महिन्यानिमित्त श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे जाणाऱ्या भाविकांसाठी दहा जादा बस सोडण्याचा निर्णय सिटीलिंक प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. (10 extra buses of Citylinc to Trimbakeshwar to run in Shravan Nashik Latest Marathi News)
श्रावणात बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर या ठिकाणीदेखील भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यातच श्रावण महिन्यात सोमवारला विशेष महत्त्व असल्यामुळे सोमवारी विशेष गर्दी असणार आहे.
त्यामुळे भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी सिटीलिंककडून पहिल्या, दुसऱ्या व चौथ्या सोमवारी दररोजच्या २२ बसव्यतिरिक्त दहा जादा बसचे नियोजन करण्यात आले आहे.
सोमवारी त्र्यंबकेश्वरसाठी असलेल्या नियमित बसबरोबरच या अतिरिक्त दहा बसचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे जास्तीत-जास्त भाविकांनी या जादा बसचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.