Nashik : दुकानाचा दरवाजा तोडून 10 हजाराची रोकड लंपास

भद्रकाली पोलिस ठाण्यात दुकान मालकाच्या तक्रारीवरून अज्ञात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
crime news
crime newsesakal

जुने नाशिक : दुकानातील कॅश काउंटर फोडून दहा हजारांची रोकड लंपास केल्याची घटना घडली. गंजमाळ, पंचशीलनगर येथे संकेत शहा यांचे होलसेल खाद्यपदार्थ विक्रीचे दुकान आहे. गुरुवारी (ता. २६) नेहमीप्रमाणे ते दुकान बंद करून घरी परतले. शुक्रवारी (ता. २७) दुकान उघडण्यासाठी गेले असता त्यांना दुकानातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले. चोरट्यांनी दुकानातील कॅश काउंटर फोडून दहा हजारांची रोकड लंपास केल्याचे लक्षात आले.

शिवाय सीसीटीव्ही कॅमेऱ्याची वायर, डीव्हीआरसह बारकोडिंगचे प्रिंटर तसेच अन्य साहित्याची तोडफोड केल्याचे दिसून आले. भद्रकाली पोलिस ठाण्यात श्री. शहा यांच्या तक्रारीवरून अज्ञात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल झाला.

crime news
सासऱ्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपातून सुनेची निर्दोष मुक्तता
crime news
इंधनावरील कर कपातीची घोषणा हवेतच

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com