Marathi Literary Conference in Nashik
sakal
नाशिक: मे १८७८ मध्ये सुरू झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला १०० वर्षांची ऐतिहासिक शतकी परंपरा पूर्ण होत असून, १०० वे साहित्य संमेलन कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये आयोजित करण्यासाठी हालचाली वेग घेत आहेत. याबाबतचा औपचारिक प्रस्ताव येत्या सातारा साहित्य संमेलनात मांडण्यात येणार असून, तो मंजूर झाल्यास शतकी साहित्य संमेलन नाशिकला होण्याचा मार्ग मोकळा होईल. तसे झाल्यास नाशिकला हा सन्मान चौथ्यांदा लाभणार आहे.