Marathi Sahitya Sammelan
sakal
नाशिक: कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शंभरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिकमध्ये व्हावे, यासाठी शहरातील सामाजिक संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन कुंभमेळा प्राधिकरणाच्या वतीने करण्यात आले होते. मात्र साताऱ्यात झालेल्या नव्याण्णवाव्या साहित्य संमेलनात अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी शंभरावे संमेलन पुणे येथेच होणार असल्याची ठाम घोषणा केल्यानंतर नाशिकच्या साहित्यिक आकांक्षांना मोठा धक्का बसला आहे.