esakal | नाशिकमध्ये ऑक्सिजन गळतीमुळे 11 रुग्णांचा मृत्यू; राजेश टोपे यांची धक्कादायक माहिती

बोलून बातमी शोधा

Rajesh-Tope
नाशिकमध्ये ऑक्सिजन गळतीमुळे 11 रुग्णांचा मृत्यू; राजेश टोपे यांची धक्कादायक माहिती
sakal_logo
By
रोहित कणसे

नाशिक : शहरातील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टाकीला गळती झाल्याने अकरा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ऑक्सिजन टाकीच्या वॉलमधून लिकेज झाल्यामुळे प्रेशर कमी झाले व 11 व्हेंटीलेटेड पेशंट मृत्यूमुखी पडल्याची धक्कादायक माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रशासनाच्या हवाल्याने दिली आहे.

महानगरपालिकेचे डॉ. झाकीर हुसेन कोविड सेंटरमधील टॅंकमध्ये ऑक्सिजन भरताना टॅन्कचा पाइपचा जोड तुटून ऑक्सिजन लीक झाला यामुळे अनेक कोरोना रुग्णांना इतरत्र हलवण्यात आले. दरम्यान ऑक्सिजन न मिळाल्याने रुग्ण दगावले असण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती आता प्रशासनाच्या हवाल्याने आरोग्यमंत्र्यानी 11 रुग्ण दगावल्याचे सांगीतले आहे. तसेच मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.