11th Admission : अर्जाचा भाग 2 भरण्याची प्रक्रिया शुक्रवारपासून | Latest marathi news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

part 2 for for 11th admission latest marathi news

11th Admission : अर्जाचा भाग 2 भरण्याची प्रक्रिया शुक्रवारपासून

नाशिक : येथील नाशिक महापालिका (NMC) हद्दीतील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशाच्‍या (11th admission) प्रक्रियेला अखेर मुहूर्त लागणार आहे. शिक्षण विभागाने (Education department) सोमवारी (ता. १८) अर्ज प्रक्रियेसंदर्भात महत्त्वाचे परीपत्रक जारी केले आहे.

त्‍यानुसार अकरावी प्रवेशाचा भाग दोन भरण्याची प्रक्रिया शुक्रवार (ता. २२) पासून सुरू होणार आहे, तर सीबीएसई बोर्डाचा (CBSE Board) निकाल जाहीर झाल्‍यानंतर प्रवेश फेऱ्यांचे सविस्‍तर वेळापत्रक जारी केले जाईल. (11th Admission Part 2 filling process of application from starting from Friday nashik education Latest marathi news)

इयत्ता दहावीचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच गेल्‍या ३० मेपासून अकरावी प्रवेशाच्‍या नोंदणीची प्रक्रिया सुरल झालेली होती. नाशिक महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये केंद्रिभूत ऑनलाइन पद्धतीने प्रवेश दिले जाणार आहेत.

शैक्षणिक वर्ष २०२२-२३ च्‍या प्रवेश प्रक्रियेंतर्गत विद्यार्थ्यांना ऑनलाइन नोंदणी प्रक्रियेत अर्जाचा भाग एक भरायची प्रक्रिया सुरू आहे.

यात विद्यार्थ्यांना त्‍यांची वैयक्‍तिक माहिती दाखल करायची आहे, तर इयत्ता अकरावीची शाखा व महाविद्यालयाच्‍या पसंतीक्रम निवडीसाठी अर्जाचा भाग दोन सुरू होण्याची प्रतीक्षा विद्यार्थ्यांना लागून होती. अखेर सोमवारी शिक्षण विभागाने यासंदर्भात परिपत्रक जारी केले. त्‍यानुसार अर्जाचा भाग दोन भरण्याची प्रक्रिया शुक्रवारपासून सुरू होणार आहे.

हेही वाचा: पिकअपच्या धडकेत थोडक्यात बचावला वाहतूक पोलिस; तक्रार मात्र दाखल नाही

दहापर्यंत पसंतीक्रम नोंदविता येणार

अर्जाच्या भाग दोन अंतर्गत किमान एक ते कमाल दहापर्यंत शाखा, महाविद्यालयांचा पसंतीक्रम नोंदविता येणार आहे. यापूर्वीच्‍या नियमानुसार पहिल्‍या पसंतीक्रमाचे महाविद्यालयासाठी निवड झाल्‍यास विद्यार्थ्यांना प्रवेश घेणे बंधनकारक राहण्याची शक्‍यता आहे.

हेही वाचा: नाशिक : YCMOUच्‍या रस्त्याची दुर्दशा

Web Title: 11th Admission Part 2 Filling Process Of Application From Starting From Friday Nashik Education Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..