Nashik News: दिवाळीनिमित्त रात्रपाळीत घंटागाड्या; बाजारपेठांमधून प्रतिदिन 12 टन अतिरिक्त कचरा संकलन

NMC Garbage Truck
NMC Garbage Truckesakal

Nashik News : दिवाळीनिमित्त शहरात मोठ्या प्रमाणात घनकचरा बाहेर पडत आहे. त्यातही बाजारपेठेत हे प्रमाण अधिक असल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने अतिरिक्त पंधरा घंटागाड्या सुरू करण्यात आल्या आहेत.

वाहतूक ठप्प होण्याचे प्रकार असल्याने घंटागाड्या रात्रपाळीत चालविल्या जात आहेत. घंटागाडीच्या माध्यमातून दररोज जवळपास १२ टन अतिरिक्त कचरा संकलित होत असल्याने खत प्रकल्प देखील रात्री दहापर्यंत सुरू ठेवला जात आहे, अशी माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. आवेश पडोळ यांनी दिली. (12 tonnes of additional waste collection per day from markets by nmc garbage van nashik news)

महापालिकेच्या वतीने शहरात घनकचरा संकलन करण्यासाठी घंटागाडीची व्यवस्था करण्यात आली आहे जवळपास साडेतीनशे घंटागाड्यांच्या माध्यमातून कचरा संकलन करून पाथर्डी येथील कचरा डेपोत टाकला जातो. तेथे कचऱ्यावर प्रक्रिया करून खत तयार केले जाते. दररोज जवळपास ५०० टन कचरा शहरातून संकलित होतो.

दिवाळीत मात्र कचऱ्याचे प्रमाण वाढते. यंदाही तीच परिस्थिती असून, दररोज जवळपास १२ ते १५ टन घनकचरा तयार होत आहे. मुख्यत्वे बाजारपेठेत कचरा तयार होत असून, त्या अनुषंगाने अतिरिक्त १५ घंटागाड्या नियुक्त करण्यात आले आहेत; परंतु बाजारपेठेत वाहतूक ठप्प होत असल्याने रात्रपाळीमध्ये घंटागाड्या चालविल्या जात आहेत.

NMC Garbage Truck
Maratha OBC Reservation: ओबीसी विरुद्ध मराठा असे वातावरण योग्य नाही; महसूलमंत्री विखे-पाटील यांचे प्रतिपादन

सकाळ व रात्र अशा दोन सत्रांत घंटागाड्या तैनात करण्यात आल्या आहेत. घंटागाड्यांच्या माध्यमातून संकलित करण्यात आलेला कचरा तातडीने खत प्रकल्पावर नेऊन तेथील प्रक्रिया केली जात आहे. दरम्यान, बाजारपेठेतील कचरा संकलित करण्याबरोबरच कचऱ्याचे ‘ब्लॅक स्पॉट’देखील तातडीने स्वच्छ करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. बाजारपेठांमध्ये अतिरिक्त सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

"दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा तयार होत असून, तो कचरा संकलित करून तातडीने खत प्रकल्पावर दिला जात आहे. कचरा संकलनासाठी सकाळ व रात्र अशा दोन सत्रांत १५ अतिरिक्त गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.'' - डॉ. आवेश पलोड, संचालक, घनकचरा व्यवस्थापन विभाग

NMC Garbage Truck
Nashik News: ठेकेदारांची कोट्यवधींची देयके रखडलेलीच; बांधकाम विभागाकडून निधी देणेच बंद

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com