नाशिक : 125 विद्यार्थिनींची फसवणूक; शिक्षणाचा बाजार

nashik girl
nashik girlesakal

नाशिक रोड : शिक्षणाच्या नावाखाली बाजार मांडण्याचा प्रकार येथील एका महाविद्यालयासंदर्भात उघडकीस आला. या प्रकारामुळे विद्यार्थिनींना मनस्ताप सहन करावा लागत आहे. यावेळी अनेक विद्यार्थिनींनी रडायला सुरवात केली.

शिक्षणाच्या नावाखाली बाजार; 125 विद्यार्थिनींची फसवणूक

मुंबई येथील श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठांतर्गत येत असलेल्या के. एन. केला महिला महाविद्यालयात ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थिनी शिकण्यासाठी येतात. अर्धवट राहिलेले शिक्षण पूर्ण करण्यासाठी अनेक महिलांनीही महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे. मात्र, 125 विद्यार्थिनींकडून तीन ते साडेचार हजार रुपये फी घेऊनही त्यांचे विद्यापीठात प्रवेश नसल्याचे उघड झाले. या विद्यार्थिनी बुधवारी (ता. १५) पेपर देण्यासाठी गेल्या. मात्र, त्यांच्या ऑनलाइन परीक्षेचा कोड पेपर सुरू होण्यापर्यंत मिळाला नाही. त्यामुळे विद्यार्थिनींनी विद्यापीठात फोनद्वारे विचारणा केली. तिकडून महाविद्यालयात संपर्क साधण्याचे सांगण्यात आले. महाविद्यालयाने पुन्हा विद्यापीठात संपर्क साधण्यास सांगितले. ही टोलवाटोलवी बराच वेळ सुरू होती. शेवटी उशिरा १२५ विद्यार्थिनींचा प्रवेशच झाला नसल्याचे विद्यापीठाकडून कळविण्यात आले. हे समजताच अनेक विद्यार्थिनींनी रडायला सुरवात केली.

nashik girl
अमित शहा आज नांदेड दौऱ्यावर; राजकीय वर्तुळाचं लक्ष

महाविद्यालयासंदर्भात धक्कादायक प्रकार उघडकीस

एकतर वर्ष वाया गेले आणि दुसरीकडे प्रवेशशुल्काचे पैसे बुडाले. याबाबत विद्यार्थिनींनी प्राचार्यांशी संपर्क साधला. मात्र, त्यांच्याकडून समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत. काही विद्यार्थिनींनी सभापती दिवे यांच्याकडे धाव घेत समस्या सांगितली. तेव्हा या विद्यार्थिनींचा नावाची विद्यापीठात नोंद नसल्याचे उघड झाले. गुरुवारी (ता. १६) विद्यार्थिनी या महाविद्यालयात प्रशासनाला जाब विचारू लागल्या. या वेळी श्री. दिवे यांनी महाविद्यालय प्रशासन आणि विद्यार्थिनींची बाजू समजून मध्यस्थी केली. जयश्री घोडेराव, अमिता बागूल, पूजा गायकवाड, सृष्टी टाकळकर, रूपाली बहादुरे, साक्षी कांबळे, इफत मनियार, सुश्मिता पवार, दीपाली पवार, मनाली पांडे व इतर विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

nashik girl
'शेतकरी नवरा नको'ला शेतकरीपुत्राचे उत्तर! पंचक्रोशीत कौतुक

अतिरिक्त फी परत देण्याचे आश्वासन

प्रवेशाच्या नावाखाली तब्बल १२५ विद्यार्थिनींना या महाविद्यालयाने गंडा घातल्याचे उघड झाले आहे. वर्ष वाया जाणार असल्याने या विद्यार्थिनींना मनस्ताप सहन करावा लागत आहे. विद्यार्थिनींचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ न देण्याचे अन्‌ अतिरिक्त फी परत देण्याचे आश्वासन महाविद्यालयातर्फे प्राचार्या अश्विनी दापोरकर, प्रा. आशिष कुटे यांनी दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com