दोन्ही दोन्ही ‘सीईटी’ परिक्षा ‘सीईटी’ परिक्षा

दोन्ही दोन्ही ‘सीईटी’ परिक्षा ‘सीईटी’ परिक्षा
Published on: 
(बारावीच्या विद्यार्थ्यांचे संग्रहित छायाचित्र वापरावे) -------- यंदा बारावी परीक्षेनंतरच दोन्ही ‘सीईटी’ अभ्यासाला मिळणार पुरेसा वेळ; उच्च तंत्रशिक्षण विभागाचा निर्णय सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता.२४ : यंदा बारावीच्या विद्यार्थ्यांना राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) दोनदा देण्याची संधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मात्र, डिसेंबरमध्ये प्रस्तावित असलेली सीईटी परीक्षा उच्च व तंत्रशिक्षण विभागाने रद्द केली आहे. आता दोन्ही सीईटी परीक्षा बारावीच्या बोर्ड परीक्षेनंतर आयोजित केल्या जाणार असल्याने विद्यार्थ्यांना बारावीच्या अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळणार आहे. या निर्णयामुळे बोर्डाची परीक्षा आणि सीईटीची तयारी एकाच वेळी करण्याचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे. लवकरच वेळा पत्रक जाहीर होइल, अशी माहिती उच्च तंत्र शिक्षण विभागाच्या सूत्रांनी दिली. प्रस्तावित सीईटी रद्द विद्यार्थ्यांना बारावीच्या बोर्ड परीक्षेच्या तयारीसोबतच सीईटीची तयारी करण्यासाठी स्वतंत्र वेळापत्रक आखण्याची गरज कमी होणार आहे. विद्यार्थ्यांना बारावीच्या अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रित करता येईल. दोनदा सीईटीची संधी अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी महत्त्वाची मानली जाते. विद्यार्थ्यांना परीक्षेतील कामगिरी सुधारण्याची आणखी एक संधी मिळावी, या उद्देशाने वर्षातून दोनदा सीईटी घेण्याचे नियोजन करण्यात आले होते. सर्वाधिक गुण ग्राह्य विद्यार्थ्यांना दोनदा सीईटी परीक्षा देता येणार असल्यास दोन्ही परीक्षांतील गुणांची तुलना करून प्रवेशासाठी कोणते गुण ग्राह्य धरले जाणार, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. याप्रकरणी शासनाने खुलासा करावा, अशी अपेक्षा विद्यार्थ्यांकडून व्यक्त होत आहे. चौकट दोन्ही परीक्षांत चार आठवड्यांचे अंतर दोन्ही सीईटी परीक्षांमध्ये चार आठवड्यांचे अंतर ठेवण्याचे नियोजन आहे. त्यामुळे पहिली परीक्षा दिल्यानंतर विद्यार्थ्यांना आपल्या कामगिरीचे मूल्यमापन करता येईल. ज्या विषयांमध्ये किंवा घटकांमध्ये गुण कमी मिळाले, त्यावर अधिक मेहनत घेता येईल. नवीन नियोजनानुसार दोन्ही सीईटी परीक्षा बारावीच्या बोर्ड परीक्षेनंतर घेतल्या जाणार आहेत. त्यामुळे बोर्ड परीक्षेपूर्वी सीईटीच्या तयारीसाठी स्वतंत्र वेळ काढण्याची कसरत विद्यार्थ्यांना करावी लागणार नाही. ----------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com