Nashik Water Tanker: राज्यात गतवर्षांपेक्षा 134 टँकर जास्त! टंचाईत साताऱ्याने नाशिकला केले ‘ओव्हरटेक'

Water Tanker
Water Tankeresakal
Updated on

Nashik Water Tanker : मॉन्सूनचे विलंबाने झालेले आगमन, त्यातही सातत्य नसल्याने राज्यातील ३६४ गावे आणि ९५५ वाड्यांना ३२६ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू ठेवावा लागला. गेल्या वर्षी ११ जुलैला २१९ गावे आणि ४०० वाड्यांना १९२ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू होता.

म्हणजेच काय, तर प्रशासनाला गेल्या वर्षीपेक्षा १३४ अधिक टँकर सुरू ठेवावे लागले. (134 more tankers in state than last year Satara overtook Nashik in shortage)

राज्यात गेल्या आठवड्याचा विचार करता, आता ३७ गावे आणि ३४ वाड्यांचा ३४ टँकरद्वारे होणारा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. गेल्या आठवड्यापर्यंत सर्वाधिक टँकरद्वारे नाशिक जिल्ह्यात पाणीपुरवठा सुरू होता.

७८ गावे आणि ५९ वाड्यांसाठी ६५ टँकर सुरू होते. आज ६७ गावे आणि ३६ वाड्यांसाठी ५३ टँकर सुरू आहेत. सर्वाधिक टंचाईमध्ये सातारा जिल्ह्याने नाशिकला ‘ओव्हरटेक’ केले आहे. सातारा जिल्ह्यात आज ५७ गावे आणि २७१ वाड्यांना ५४ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

नाशिक, नंदुरबार, जळगाव, नगर जिल्ह्यांतील १५४ गावे आणि ३०९ वाड्यांना १३७, तर पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, सांगली जिल्ह्यांतील १२० गावे व ६४२ वाड्यांना १०६ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू होता.

औरंगाबाद, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांतील ५७ गावे आणि चार वाड्यांसाठी ४९, अमरावती, वाशीम, बुलडाणा जिल्ह्यांतील ३३ गावांना ३४ टँकर सुरू आहेत.

कोकण आणि नागपूर विभागात एकही टँकर सुरू नाही. तसेच राज्यातील दोन हजार ९८९ मोठे, मध्यम व लघुप्रकल्पात गेल्या वर्षीच्या तुलनेत ७.०५ टक्क्यांनी कमी साठा उपलब्ध आहे.

विभागनिहाय धरणातील साठा

विभागनिहाय धरणांची संख्या व सध्याच्या जलसाठ्याची टक्केवारी (कंसात गेल्या वर्षीच्या जलसाठ्याची टक्केवारी दर्शवते) : अमरावती- २५९-३८.१८ (४२.५४), औरंगाबाद- ९१९-२४.४४ (३३.५८), कोकण- १७३-४९.८५ (५७.७८), नागपूर- ३८३-४६.५४ (३९.२१), नाशिक- ५३५-२८.१९ (३१.४७), पुणे- ७२०-१९.२१ (२४.०२). दरम्यान, राज्यात आतापर्यंत ७२.४ टक्के पाऊस झाला असून,

गेल्या वर्षी याच काळात १०८.३ टक्के पावसाची नोंद झाली होती. गेल्या आठवड्यापर्यंत खरीप हंगामातील पिकांच्या पेरण्यांची टक्केवारी १४.४५ टक्क्यांपर्यंत पोचली होती. त्यात आठवडाभरात वाढ होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Water Tanker
Dangerous School Building: जिल्ह्यात 441 शाळा धोकादायक इमारतीत! सर्वाधिक 85 शाळा सुरगाण्यातील

कमी अन् अधिक पावसाची स्थिती

राज्यात कमी आणि अधिक पावसाची स्थिती तयार झाली आहे. सांगली जिल्ह्यात ३५.५, कोल्हापूरमध्ये ३८.४, अकोल्यात ३५.५, परभणीत ४७.१, हिंगोलीत ४४.४ टक्के असा कमी पाऊस झाला आहे.

दुसरीकडे ठाणे जिल्ह्यात १०४.६, पालघरमध्ये १३५.२, गोंदियामध्ये १०२.४ टक्के पाऊस झाला आहे. उत्तर महाराष्ट्रातील जिल्हानिहाय आतापर्यंतच्या पावसाची टक्केवारी (कंसात गेल्या वर्षीच्या पावसाची टक्केवारी दर्शवते) : नाशिक-६८.६ (१०७.३), धुळे-८५.६ (१०३.५), नंदूरबार-६१.२ (५१.४), जळगाव-७०.३ (८८.९), नगर-६५.९ (११४.५).

विभागनिहाय पर्जन्यमान (आकडे टक्क्यांमध्ये)

विभागाचे नाव आताचा पाऊस गेल्या वर्षीचा पाऊस

अमरावती ५८.५ १०६.८

औरंगाबाद ६२.४ १३५.७

कोकण ९१.९ ११०.५

नागपूर ७५.३ ११२.७

नाशिक ६६.४ ९३.१

पुणे ४४.५ ७३.८

Water Tanker
Shravan Maas: धार्मिक पुस्तकांच्या मागणीत वाढ! ज्येष्ठांबरोबरच तरुणाईचा धार्मिकता, अध्यात्माकडे वाढता कल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com