नाशिक जिल्ह्यात ऑक्सीजनचे १४ प्रकल्प अंतिम टप्प्यात

oxygen storage in nashik
oxygen storage in nashike-sakal
Updated on

नाशिक : कोरोनाची वाढती रुग्णसंख्या व संभाव्य तिसऱ्या लाटेला (Third Wave of Corona) तोंड देण्याचे नियोजन आता गतिमान झाले आहे. दुसऱ्या लाटेत ऑक्सीजन अभावी झालेल्या मृत्युंपासून धडा घेत प्रशासनातर्फे ऑक्सीजन उपलब्धतेबाबत नियोजनावर अधिक भर दिला जात आहे. येत्या आठवड्याभरात जिल्ह्यात १४ ऑक्सीजन प्रकल्प (Oxygen Plants) सुरु होण्याच्या स्थितीत आहेत.

नाशिक जिल्ह्यात तीन आठवड्यापासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत पुन्हा एकदा किंचित वाढ दिसत आहे. निर्बंध शिथील केल्यापासून बाजारपेठा व रस्त्यांवर नागरिकांची गर्दी पुन्हा वाढत आहे. त्यामुळे कोरोना रुग्णसंख्येच्या घसरत्या आलेखाला ब्रेक लागला असून, अल्पशी वाढ सुरु झाली आहे. ३० जुलैला १ हजार ०३० असलेली रूग्णसंख्या सलग दोन आठवड्यापासून वाढून १ हजार १२७ वर पोचली आहे. हजाराच्या आत आलेली रूग्णसंख्या आता आकराशेच्या पुढे गेली आहे. सध्या ऑक्सजन बेडवर असलेल्या रूग्णांचे प्रमाण १.३५ टक्के इतकेच असून, मृत्युचा दर २.०७ टक्के आहे. हे प्रमाण कमी होत नसल्याने प्रशासनाने तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर तयारी सुरु केली आहे.

oxygen storage in nashik
नाशिक : टोलनाक्यावर तृतीयपंथी- वाहन चालकांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी

दरम्यान, जिल्ह्यात ऑक्सीजनच्या २४ प्रकल्पांचे नियोजन करण्यात आले आहे. प्रस्तावित प्रकल्पांमुळे शहरात २८९ मेट्रीक टन, तर ग्रामीण भागात १३७ याप्रमाणे ४२६ मेट्रीक टन ऑक्सीजनची क्षमता तयार होणार आहे. तसेच, जिल्ह्यात ऑक्सीजन वाहतूकीसाठी २ टँकर होते. आता त्यात आणखी ३ टँकरची वाढ करण्यात आली आहे. येत्या आठवडाभरात काम सुरु असलेले १४ प्रकल्प सुरु होतील, अशी स्थिती आहे.

oxygen storage in nashik
अवीट गोडीला समस्यांची आडवी नाडी! दशकापासून द्राक्षपंढरीला लागली घरघर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Education expert Bhausaheb Chaskar urged immediate restructuring of the Teacher Eligibility Test to improve the quality of school education.
Tukaram Mundhe milk adulteration complaint
Who is Prashant Wadile?
MP Supriya Sule
Marathi News Esakal
www.esakal.com