Nashik : Columbia अन् Ghana Universityतून 14 वर्षीय गीत झाली 'Doctorate'

Geet Patni
Geet Patniesakal

नाशिक : सर्वांत युवा योग शिक्षक पुरस्‍काराने सन्‍मानित गीत पराग पटणी या चिमुकलीने कोलंबिया आणि घाणा विद्यापीठातून डॉक्‍टरेट पदवी मिळविली आहे. यासंदर्भात १४ वर्षीय गीतने रविवारी (ता. ९) पत्रकार परिषदेत माहिती दिली. कमी वयात हा बहुमान मिळविणारी ती देशातील पहिली मुलगी असल्‍याचा दावा गीत योगा फिटनेस अकादमीच्‍या संस्थापक अध्यक्षा डॉ. काजल पटणी व डॉ. पराग पटणी यांनी केला आहे. (14 year old geet patani achieve Doctorate from Columbia Ghana University Nashik Latest Marathi News)

Geet Patni
Uttar Pradesh : दानापूर परिसरात पावसाचा कहर सुरूच!

कोरोना महामारीत सर्वच क्षेत्र प्रभावित झाले असताना, सर्वांनाच कोरोनाच्या गंभीर परिस्थितीचा सामना करावा लागला. या कालावधीत अनेकांनी चांगल्‍या कामासाठी उपयोग करून घेतल्‍याचे बघायला मिळते. काहींकडून मात्र या कालावधीत गॅझेटचा अतिवापर करण्यात आला. ही गोष्ट लक्षात घेऊन गीतने ‘कोरोना काळात लहान मुलांकडून मोबाइलसह इतर गॅझेटचा वापर आणि त्याचा त्यांच्या मानसिकतेवर परिणाम व योग अभ्यासातून त्यावर उपाय’ या विषयावर प्रबंध लिहिला होता.

पुढे हा प्रबंध तिने जगभरातील सात नामांकित विद्यापीठांना सादर केला होता. त्यातील कोलंबिया आणि घाणा या प्रतिष्ठेच्या आंतरराष्ट्रीय विद्यापीठांनी तो प्रबंध स्वीकारला आहे. त्यासाठी गीतला डॉक्टरेट ही मानाची पदवी प्रदान केली आहे. नुकतेच याबाबतचे प्रमाणपत्र प्राप्त झाले असून, अवघ्या चौदाव्या वर्षी अशाप्रकारच्या दोन विद्यापीठांची डॉक्टरेट मिळविणारी गीत देशातील पहिलीच मुलगी ठरली आहे. आतापर्यंत देशातील एका मुलाने वयाच्या दहाव्या वर्षी आंतरराष्ट्रीय विद्यापीठाची डॉक्टरेट मिळविली आहे, अशी माहिती पटणी दांपत्‍याने दिली.

Geet Patni
Kojagiri Paurnima 2022 : शरदाच्या चांदण्यात दुग्धप्राशनाचा आनंद

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com