
Nashik Crime News : सटाणा पोलिसांकडून 15 गोवंश जनावरांची सुटका
सटाणा (जि. नाशिक) : पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक किरण पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने दोन वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करीत १५ गोवंश जनावरांची सुटका केली. बागलाण तालुक्यातील वीरगाव व ब्राह्मणगाव येथे ही कारवाई करण्यात आली. (15 cattle rescued from Satana police Nashik Crime News)
हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस
याप्रकरणी सटाणा पोलिसांनी दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यांच्याकडून ४ लाख ८४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. चारचाकी (एमएच ४१ जी २६२८) या वाहनातून अकरा गाय गोवंशाची ढोलबारे शिवारातून विरगावमार्गे मालेगावच्या दिशेने कत्तलीसाठी बेकायदेशीर वाहतुक करण्यात येणार असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी नाकाबंदीत गोवंशची वाहतूक करणाऱ्यांना ताब्यात घेतले.
दुसऱ्या कारवाईत चारचाकी (एमएच ४३ एडी २८२५) वाहनातून चार गोवंशाची सुटका पोलिसांनी करत संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करत वाहने जप्त केली.