Nashik Crime: वणी पोलिस हद्दीत कोम्बिंग ऑपरेशन राबवून 15 जणावरांची सुटका

cattles
cattlesesakal

Nashik Crime : बकरी ईदच्या दिवशी गुरांची कत्तल रोखण्याच्या अनुषंगाने वणी पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवत खेडगांव व कोशिंबे शिवारात या दोन ठिकाणाहून सुमारे २ लाख ४४ हजार रुपये किंमतीच्या १५ गोवंश जातीचे जणावरांची सुटका केली आहे.

याप्रकरणी दोघा संशयीत आरोपीवर वणी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (15 cattles rescued by combing operation in Vani police area Nashik Crime)

वणी पोलिस ठाण्याच्या हद्दीत वणी पोलिसांनी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर सोमवारी, ता. २६ रोजी कॉम्बींग ऑपरेशन राबविले.

यात खेडगांव, ता. दिंडोरी शिवारात रात्री १०.३० वाजेच्या दरम्यान खेडगाव ते वडनेरभैरव जाणारे रस्त्यावरील कुणाल सतिष गांगुर्डे, रा. खेडगाव ता. दिंडोरी याने त्याच्या असलेल्या शेतात गोवंश जातीचे दोन गायी व नऊ गो-हे असे १ लाख ९० हजाराचे रुपये किमंतीचे जणावरे कत्तल व वाहतुक करण्याचे उद्देशाने क्रूरपणे कत्तल करण्याचे उद्देशाने बांधुन ठेवल्याचे आढळून आल्याने पोलिसांनी कुणाल गांगुर्डे यांच्यावर प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम कायद्यान्वये पोलिस शिपाई राहूल यादव आहेर यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

cattles
Delhi Crime : चोरांचा ईमानदारपणा, ज्यांना लुटायला आले, त्यांच्याच हातावर पैसे टेकवुन झाले फरार

तसेच कोशिंबे शिवारात मंगळवार, ता. २७ रोजी मध्यरात्री १.३० वाजेच्या सुमारास कोशिंबे शिवारातील कोशिंबे ते कोकणगाव खुर्द जाणारे रस्त्याच्या कडेला मोकळ्या जागी एका झाडाला संशयीत आरोपी भु-या ऊर्फे सदमाखान अहमदखान रा. कमालपुरा, मालेगांव यांने गोवंश जातीचे १ गाय, १ बैल, २ गो-हे असे ५४ हजार किमंतीचे चार जनावरे अवैधरित्या कत्तल करण्याचे उद्देशाने व अवैध वाहतुक करणेचे उद्देशाने क्रूरपणे बांधुन ठेवलेले आढळले.

पोलिस अमंलदार विजय खांडवी यांच्या फिर्यादीवरुन भु-या ऊर्फे सदमाखान अहमदखान यांच्यावर महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम व प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत वेगवेगळ्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान पोलिसांनी सर्व जणावरे ताब्यात घेवून पशुवैद्यकिय अधिकारी यांच्याकडून जणावरांची तपासणी करुन वणी येथील गोशाळेत जनावरांना पालणपोषणासाठी दाखल करण्यात आली आहे.

cattles
Nagpur Crime : कामगाराने केली धाबा मालकाची कुऱ्हाडीने हत्त्या

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com