Latest Marathi News | सीसीटीव्हीसाठी शहर पोलिसांना 15 कोटी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

CCTV News

Nashik News : सीसीटीव्ही साठी शहर पोलिसांना 15 कोटी

नाशिक : नाशिक शहरात सीसीटीव्ही बसविण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १५ कोटी निधी मंजूर केला आहे. चार दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांसोबत मंत्रालयात झालेल्या बैठकीत खासदार हेमंत गोडसे यांनी सीसीटीव्ही बसविण्यासाठी निधीची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मूलभूत सोयी सुविधांचा विकास या योजनेअंतर्गत शहरात सीसीटीव्ही बसविण्यासाठी पंधरा कोटींच्या निधीला मान्यता दिली आहे.

या निधीतून शहरातील प्रमुख रस्ते आणि चौकात सीसीटीव्ही बसविण्यात येणार असून काही विकासकामेही करण्यात येणार आहे. या सीसीटीव्ही मुळे पोलिस प्रशासनाचाही कामाचा भार काही अंशी कमी होणारा आहे. शहराची सुरक्षा मजबूत होणार असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली आहे. (15 crore to city police for CCTV for observe growing crime in in city Nashik News)
हेही वाचा : मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

हेही वाचा: Motivational Story : पिंपळगावच्या आदित्यची विक्रीकर निरीक्षकपदाला गवसणी

विकास कामांना निधी
सीसीटिव्ही बरोबरच जुने सायड्रिक इंडिया कंपनी ते पंचक चौक दरम्यानचा रस्ता डांबरीकरण करणे, प्रभाग क्रमांक २४ मधील शिवालय कॉलनी येथील महानगरपालिका ओपन स्पेसचे सुशोभीकरण करणे व रस्ता बांधणे, प्रभाग क्रमांक २७ मधील श्रीकृष्ण नगर येथील ओपन स्पेस येथे सांस्कृतिक भवन बांधणे, प्रभाग क्रमांक ३१ मधील अंबड गावातील मारुती मंदिर सर्व सभामंडप बांधणे, प्रभाग क्रमांक दोन मधील नांदूर गावाजवळील मारुती मंदिरासमोर सभामंडप बांधणे, प्रभाग क्रमांक दोन मधील मानूर गावातील मारुती मंदिरासमोर सभामंडप बांधणे, प्रभाग क्रमांक २७ मधील राजे संभाजी स्टेडिअमचे विद्युतीकरण व सुशोभीकरण करणे, प्रभाग क्रमांक २७ मधील मीनाताई ठाकरे उद्यान, अश्विन नगर येथे महिलांसाठी अभ्यासिका बांधणे, सिंहस्थ नगर परिसराचे सुशोभीकरण करणे, प्रभाग क्रमांक ३१ मधील चेतना नगर महापालिका ओपन स्पेस येथे सामाजिक सभागृह बांधणे व सुशोभीकरण करणे या विकास कामांसाठी प्रत्येकी पन्नास लाखांच्या निधीला तर प्रभाग क्रमांक तीन मधील महानगरपालिका ओपन स्पेसवर अभ्यासिका बांधणे, प्रभाग क्रमांक एक मधील सुशोभीकरण करणे या प्रत्येक कामांसाठी तीस लाखांच्या निधीला मंजुरी देण्यात आली.

हेही वाचा: Nashik News : महागाईमुळे स्वयंपाक होऊ लागला बॅटरीवरील शेगडीवर