NMC News: शहरात 16 पर्यटनस्थळे विकसित होणार! प्रकल्पांची किंमत 65 कोटी

nmc
nmcesakal
Updated on

Nashik News : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आराखडा तयार करताना त्यात पर्यटनाचा स्वतंत्र आराखडा तयार केला जात असून, शहरातील सोळा स्थळे पर्यटनस्थळे म्हणून विकसित केले जाणार आहे.

पर्यटन आराखडा अंतिम झाला नसला तरी प्रकल्पांची किंमत जवळपास ६५ कोटी रुपयांपर्यंत पोचली आहे. थीम पार्क, फेरी व ‘रोप-वे’ याचा पर्यटन आराखड्यात समावेश आहे. (16 tourist spots will be developed in city 65 crores worth of projects Nashik News)

आगामी सिंहस्थ कुंभमेळा २०२७ मध्ये होत असून, त्यासाठी प्रशासकीय पातळीवर तयारी सुरू झाली आहे. तयारीमध्ये प्रशासनाकडून पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून निधीची मागणी केली जाणार आहे.

निधीसाठी सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करण्याच्या सूचना पालकमंत्री दादा भुसे यांनी दिल्या आहेत. त्याअनुषंगाने महापालिकेने ४३ विभागांना सिंहस्थासाठी लागणाऱ्या खर्चाचा अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या.

आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांच्याकडे प्राप्त झालेल्या अहवालानुसार जवळपास तीन हजार कोटींच्या वर आराखडा पोचला आहे. त्यामुळे प्रत्येक विभागाला आठ दिवसांची नव्याने मुदत देत अंतिम आराखडा सादर करण्याच्या सूचना दिल्या.

सिंहस्थाच्या आराखड्यात पर्यटन आराखड्याचा समावेश करण्यात आला आहे. पर्यटन आराखड्यात शहरातील सोळा पर्यटनस्थळांचा विकास केला जाणार आहे.

भाविकांबरोबरच नाशिककरांना कायमस्वरूपी या पर्यटनस्थळांच्या माध्यमातून उत्पन्न व मनोरंजनाचे साधने उपलब्ध होणार आहे. जवळपास साडेसातशे कोटींचा आराखडा असून, आराखडा अंतिम करण्याचे काम सुरू आहे.

nmc
NMC News : अदलाबदलीच्या खेळात अर्थकारण रंगले; दोन कार्यकारी अभियंत्यांकडे प्रत्येकी दोन विभागांचा पदभार

थीम पार्क, जेटी अन्‌ रोप-वे

पर्यटन आराखड्यात थीम पार्क प्रस्तावित आहे. एक थीम घेऊन त्यावर आधारित उद्यानाची निर्मिती, तसेच गोदावरी नदीपात्रात जेटी व बोटिंग चालविणे तसेच रोप-वेची संकल्पना आहे. निधी मिळाल्यानंतरच संकल्पना प्रत्यक्षात आणल्या जाणार आहेत.

असा आहे आराखडा (कंसात अंदाजित रक्कम लाखात)

- सोमेश्वर धबधबा (२. ९७)

- महादेव मंदिर (९६ लाख)

- नवशा गणपती मंदिर विकास (१.५२)

- बापू पार्क (११.०९)

- गोदापार्क (उजवी बाजू)- (१९.१२)

- कुसुमाग्रज उद्यान (७५)

- पंचवटी (५.००)

- नवी भाजी बाजार (२.३५)

- कपिला संगम (५.८७)

- वाघाडी- नाग चौक वॉटर फॉल (२.९२)

- नंदिनी-गोदावरी संगम (३.९२)

- समर्थ रामदास स्वामी मठ विकास (१.७०)

- दशरथ घाट, नांदूर (४.४१)

- फेरी- (४.००)

- रोप-वे (७.००)

- थीम पार्क (३.००)

nmc
NMC News : गरज नसताना महापालिकेचे ‘ऋण काढून सण’; 100 कोटींचे कर्जरोखे काढण्याची तयारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Bhishacha Kada tourist safety Ratnagiri
Why did tourists clash at Sawantwadi Waterfall?
Best time to visit Savatkada Waterfall Rajapur
8 of India’s Top 10 Tourist Attractions Are Pilgrimage Destinations, Says Latest Data
Marathi News Esakal
www.esakal.com