Onion Export Ban: निर्यातबंदीमुळे अडकले 170 कंटेनर! मंत्री पीयूष गोयलांशी आज चर्चा

Piyush Goyal `
Piyush Goyal `esakal

लासलगाव : केंद्राच्या निर्यातबंदीच्या निर्णयानंतर मुंबई बंदरात १७० कंटेनर अडकून पडले आहेत. याबाबत तोडगा न निघाल्यास हा कांदा सडण्याची भीती व्यक्त होत असून, निर्यातदारांना फटका बसणार आहे.

दरम्यान, केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांनी या विषयावर सोमवारी (ता. ११) दिल्लीत बैठक बोलावली असून, उपमुख्यमंत्री अजित पवार या बैठकीला उपस्थित राहतील. या बैठकीअगोदरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोयल यांची भेट घेतली. (170 containers stuck due to export ban Discussion with Minister Piyush Goyal today Nashik Onion News)

केंद्राने कांदा निर्यातीवर घातलेली बंदी पुढील वर्षी ३१ मार्चपर्यंत राहणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे कांदा व्यापारी आणि उत्पादक संतप्त झाले.

निर्यातीस पाठविण्यात येणारे तब्बल १७० कंटेनर मुंबईत अडकून पडले आहेत, त्यामुळे निर्यातदारांना सुमारे १५ ते २० कोटींचा फटका बसेल. दरम्यान, चांदवड येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार सोमवारी या प्रश्नावरून ‘रास्ता रोको’ करणार आहेत.

श्री. पवार प्रथमच हे आंदोलन करणार असल्याने त्याची मोठी चर्चा आहे. हे आंदोलन लक्षवेधी ठरावे, यासाठी ‘राष्ट्रवादी’सह शेतकऱ्यांनी कंबर कसली. त्यामुळे सरकारही खडबडून जागे झाले आहे.

फलोत्पादन निर्यातदार संघटनेचे अध्यक्ष अजित शहा संघटनेतर्फे विविध मागण्यांसाठी शरद पवार यांना पत्र देतील. दरम्यान, लिलावबंदी असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. यावर लवकर तोडगा काढण्याची मागणी त्यांनी केली.

Piyush Goyal `
Onion Export Ban: निर्यातबंदीचा फेरविचार करावा; डॉ. पवार यांचे केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांना पत्र

कांदा निर्यातबंदीनंतर...

- निर्यातबंदी अधिसूचनेची वेळ, निर्णय अन्यायकारक
- वारंवार निर्बंधांमुळे परदेशी बाजारपेठेतील पकड कमी
- निर्यातीच्या विविध टप्प्यांवर कांदा अडकल्याने नुकसान
- अधिसूचना ७ ला, व्यापाऱ्यांना ती ८ ला रात्री आठला मिळाली
- अशा प्रकारे निर्णयामुळे कंटेनर बंदरातच अडकले आहेत

Piyush Goyal `
Nashik Farmer Protest: समृद्धीवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल; जलसंपदा विभागाकडून तक्रार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com