नांदगाव- आमदार सुहास कांदे यांच्या पाठपुराव्यामुळे नांदगाव मतदार संघातील मालेगाव व नांदगाव तालुक्यातील बोलठाण व हिसवळ खुर्द येथील दोन प्राथमिक आरोग्य केंद्रांसह एकूण पंचवीस उपकेंद्राच्या इमारतींच्या नूतनीकरणासाठी एकूण अठरा कोटी ४५रुपयांचा निधी शासनाच्या आरोग्य विभागाने मंजूर केला आहे. ग्रामीण भागातील आरोग्य वर्धिनी अभियानातून वर्षानुवर्षे जुन्या व मोडकळीला आलेल्या या आरोग्य केंद्राचा या निधीमुळे कायापालट होण्यास मदत होणार आहे. बोलठाण व हिसवळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या जुन्या इमारतींच्या जागेवर आरोग्य विषयक सर्व सुविधांसह नव्या इमारती उभ्या राहतील त्यासाठी पंधराव्या वित्त आयोगातून निधीची तरतूद करण्यात आली आहे.