Suicide
Suicide esakal

नाशिक : 19 वर्षीय युवकाची राहत्या घरी आत्महत्या

Published on

देवळा (जि. नाशिक ) : तालुक्यातील भावडे शिवारात कामानिमित्त वास्तव्यास असणाऱ्या युवकाने बुधवारी (ता. २३) राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या (Suicide) केली. रोहित निवृत्ती वायचळे (वय १९, रा. मुंगसरे, ता. नाशिक) असे युवकाचे नाव आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. वायचळे कुटुंबीय कामानिमित्त काही वर्षांपासून भावडे शिवारात वास्तव्यास आहेत.

Suicide
Akola ST Bus Driver Suicide : अकोल्यात धावत्या कारसमोर एसटी चालकाची आत्महत्या

बुधवारी दुपारी साडेबाराला आई- वडील शेतात कामाला आणि भाऊ बाहेर गेला असताना रोहितने गळफास घेतला. भाऊ घरी आला असता त्याला रोहितने आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. रोहितला देवळा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्याच्या पश्‍चात आई, वडील आणि एक भाऊ असा परिवार आहे. रोहित वायचळे हॉटेलवर कामाला होता. देवळा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक दिलीप लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक राम राठोड तपास करीत आहे.

Suicide
World Suicide Prevention Day 2021 - तुमची मुलंही डिप्रेशनचा शिकार होऊ शकतात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com