
सातपूर - राज्यात जानेवारी २०२१ ते डिसेंबर २०२३ दरम्यान एकूण १९१ वेठबिगारांची मुक्तता करण्यात आली. त्यातील १०४ वेठबिगार कातकरी समाजाचे आहेत. नाशिक जिल्ह्यातील सुमारे ३१ वेठबिगार कामगारांना ५५ लाखांची रक्कम वाटप करण्यात येत आहे, अशी माहिती कामगार उपायुक्त विकास माळी व सहाय्यक आयुक्त चंद्रकांत बिरार यांनी दिली.