Crime Update : शहरात 2 मुले, 3 मुलींचे अपहरण

abduction of child
abduction of childesakal

नाशिक : शहरात परिसरातून दोन मुलासह तीन मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी विविध पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल झाले आहेत. विशेषत: दोन मुलांचे अपहरण झाल्याने पालकांमध्ये भितीचे वातावरण आहे.

एकीकडे सोशल मीडियावरून मुलांचे पळवून नेणारी टोळी शहरात आल्याची अफवा पसरविली जात आहे. त्यातच अपहरणाचे प्रकार वाढल्याने पालकांमध्ये भितीचे वातावरण आहे. परंतु, पोलिसांनी सोशल मीडियावर व्हायरल संदेश अफवा असल्याचे म्हटले आहे. (2 boys 3 girls kidnapped in city After rumours on social media nashik Latest Crime News)

आडगावात भाच्यानेच मामाच्या मुलीचे अपहरण केल्याचे समोर आले आहे. पंचवटीतील जुना बस डेपोजवळ राहणाऱ्या संशयित भाच्याने औरंगाबाद रोड परिसरात राहणाऱ्या मामाच्या मुलीचे मंगळवारी (ता.२०) रात्री फूस लावून पळवून नेले आहे. याप्रकरणी आडगाव पोलिसात गुन्हा दाखल आहे. आडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शिलापूर गावातून मुलीचे अपहरण झाले आहे.

अपहृत मुलीच्या पालकांच्या फिर्यादीनुसार मंगळवारी (ता.२०) त्यांच्या अपहृत मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेले आहे. याप्रकरणी आडगाव पोलिसात नोंद आहे. याचप्रमाणे, म्हसरूळ परिसरातील पेठ रोडवरील तांबे मळ्यात सुरू असलेल्या एका बांधकामाच्या ठिकाणी राहणाऱ्या मुलीला फूस लावून अज्ञात व्यक्तीने पळवून नेले आहे.

abduction of child
Sakal Exclusive : वन्यजीव अवयव विक्रीचे नाशिक बनले केंद्र; 8 महिन्यात 6 घटना

फिर्यादीनुसार म्हसरूळ पोलिसात गुन्हा दाखल झाला असून, सहायक निरीक्षक डी. डी. अहिरे हे तपास करीत आहेत. प्रबुद्धनगरमध्ये १५ वर्षीय मुलाचे अपहरण करण्यात आले आहे. मंगळवारी (ता. २०) सायंकाळी सहाच्या सुमारास त्यास अज्ञाताने कशाचे तरी आमिष दाखवून पळवून नेल्याचे त्याच्या पालकांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

याप्रकरणी सातपूर पोलिसात नोंद झाली असून, उपनिरीक्षक वाघ अधिक तपास करीत आहेत. तसेच, पंचवटीतील फुलेनगरमध्ये घराबाहेर खेळणाऱ्या मुलाचे अज्ञात इसमाने अपहरण केले आहे. फिर्यादीनुसार, फुलेनगरमधील विजय चौकातील सदर मुलगा मंगळवारी (ता.२०) रात्री सव्वाआठच्या सुमारास खेळत होता. त्या वेळी अज्ञाताने त्याचे अपहरण केले. याप्रकरणी पंचवटी पोलिसात नोंद करण्यात आली असून, सहायक निरीक्षक एस. जी. डंबाळे हे पुढील तपास करीत आहेत.

abduction of child
ग्रामीण भागात पुन्हा ‘चुली’वर स्वयंपाक; का ते जाणुन घ्या...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com