BMCची नोकरी अडीच लाखाला पडली; नाशिकच्या युवकाला दोघांनी गंडवले | Fraud | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा


Fraud

BMCची नोकरी अडीच लाखाला पडली; नाशिकच्या युवकाला दोघांनी गंडवले

सिन्नर (जि. नाशिक) : बृहन्मुंबई महापालिका अर्थात बीएमसीमध्ये (BMC) नोकरीला लावून देतो असे आमिष दाखवून नाशिक तालुक्यातील शिंदे येथील युवकाकडून २ लाख ४० हजार रुपये घेऊन आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी सिन्नर पोलिस ठाण्यात दोघा संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील एक जण अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथील असून दुसरा संशयित सिन्नर तालुक्यातील बोरखिंड येथील राहणारा आहे.

नोकरीही नाही अन् पैसेही गेेले

खंडेराव नगर, शिंदे (ता. जि. नाशिक) येथील अंबादास गिरीजाप्रसाद जाधव (३१) या युवकाने याप्रकरणी सिन्नर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. संशयित प्रदीप अण्णा मोरे हा मुंबई महापालिकेत सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत असून तो मूळचा कर्जत ता. जामखेड येथील आहे तर दुसरा संशयित रामभाऊ अशोक जाधव हा रा.बोरखिंड शिवार ता. सिन्नर येथील असून मुंबईत बेस्ट (BEST) उपक्रमात नोकरीला आहे. या दोघांनी अंबादास जाधव यास बीएमसीमध्ये नोकरीला लावून देतो असे आमिष दाखवले. त्याबदल्यात त्याच्याकडून फोन पे (Phonepe) व आरटीजीएसने (RTGS) वेळोवेळी २ लाख ४० हजार रुपये घेतले. परंतु नोकरी सोडाच घेतलेले पैसे परत न करता त्याची फसवणूक केली.

हेही वाचा: सरकारी नोकरीचे आमिष पडले महागात; दोघांना बसला 13 लाखांचा गंडा

याप्रकरणी अंबादास जाधव याने सिन्नर पोलिस ठाण्यात दोघा संशयितांविरोधात तक्रार केली. पोलिसांनी संशयित प्रदीप मोरे व रामभाऊ जाधव या दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय माळी अधिक तपास करीत आहेत.

हेही वाचा: अखेर वृद्ध माता-पित्यांना सांभाळण्याचे मुलांकडून अभिवचन

Web Title: 2 Lakh Fraud Under The Pretext Of Bmc Job Nashik Crime News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :NashikBMCFraud Crime