PFIच्या मालेगातील आणखी 2 कार्यकर्त्यांना अटक

arrest
arrestesakal

मालेगाव (जि. नाशिक) : देशविघातक कारवाया व समाजात अशांतता निर्माण करण्यास कारणीभूत असल्याच्या आरोपावरुन पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेविरुध्द राष्ट्रीय तपास यंत्रणनेने (एनआयए) महाराष्ट्रासह १५ राज्यात छापेमारी केली होती. ९३ ठिकाणी झालेल्या या छापेमारीत गुरूवारी (ता. २२) पहाटे हुडको काॅलनी भागात केलेल्या या कारवाईत येथील पीएफआय चा प्रमुख मौलाना सैफुर रहेमान अन्सारी याला अटक केली होती.

या कारवाईच्या विरोधात काही ठिकाणी आंदोलने झाली. शहरातील अन्सारी कुटुंबियांनी पत्रकार परिषद घेऊन कारवाईच्याबद्दल नाराजी व्यक्त केली. आगामी काळात याबाबत कायदा, सुव्यवस्था व शांततेसाठी प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून पीएफआयच्या आणखी दोघा कार्यकर्त्यांना नाशिक येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. (2 more PFI activists arrested in Malegaon Nashik crime Latest Marathi News)

arrest
Crime Update : Pocsoतील आरोपीला 3 वर्षांचा सश्रम कारावास

जिल्हा पाेलिस अधिक्षक सचिन पाटील, अपर पोलिस अधिक्षक चंद्रकांत खांडवी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने मंगळवारी (ता. २७) सकाळी ही कारवाई केली. या कारवाईत इरफान दौलत नदवी (रा. पवारवाडी), सादीन एकबाल अन्सारी (रा. इस्लामपुरा) या दोघांना अटक करण्यात आल्याचे श्री. खांडवी यांनी सांगितले. यापुर्वी अटक केलेला श्री. अन्सारी याला ३ ऑक्टोबरपर्यंत एटीएसची कोठडी सुनावली आहे.

आज अटक केलेल्या दोघा संशयितांची पोलिस चौकशी करीत आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. शहरात यापुर्वी छावणी, आझादनगर व आयेशानगर पाेलिस ठाण्यात पीएफआयच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांविरुध्द चारपेक्षा अधिक गुन्हे दाखल झालेले आहेत. शहरात या संघटनेचे ७५ पेक्षा अधिक सक्रिय सदस्य असल्याचे समजते. आज अटक केलेले इरफान नदवी हे येथील अध्यक्ष आहेत. जुन्या महामार्गावर या संघटनेचे कार्यालय आहे.

arrest
सिंहस्थात 200 CCTV कॅमेरे; साधुग्राम Drone Cameraच्या निगराणीत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com