Sat, Sept 23, 2023

Nashik : पहिल्या मजल्यावरून पडून चिमुरडीचा मृत्यु
Published on : 9 August 2022, 9:45 am
नाशिक : पवननगर परिसरातील इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून पडून पावणे दोन वर्षांच्या चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यु झाल्याची घटना घडली. (2 year Girl dies after falling from first floor Nashik Latest Marathi News)
समृद्धी राहुल खैरनार (१८ महिने, रा. साईज्योत अपार्टमेंट, कृष्णा साडी सेंटरच्या मागे, पवननगर, सिडको) असे मयत चिमुरडीचे नाव आहे. सदरची घटना गेल्या रविवारी (ता. ७) घडली. समृद्धी ही खेळत असताना पहिल्या मजल्यावरून खाली पडली. यात तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. तिला उपचारासाठी गंगापूर रोडवरील खासगी रुग्णालयात दाखल केले असता, उपचारादरम्यान तिचा दुर्दैवी मृत्यु झाला. याप्रकरणी अंबड पोलिसात नोंद करण्यात आली आहे.