Latest Marathi News | मालेगाव : मोसम नदीत बुडाले दोघे तरुण; शोध कार्य सुरु | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

drowning death latest marathi news

मालेगाव : मोसम नदीत बुडाले दोघे तरुण; शोध कार्य सुरु

मालेगाव : शहरातील द्याने फरशी पुलावरुन दुचाकीवर घराकडे जाणाऱ्या दोघा तरुणांचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने दुचाकीसह मोसम नदीत बुडाले. पुलानजीकच दुचाकी मिळून आली. बुधवारी (ता.१०) दुपारी सव्वादोनच्या सुमारास हा प्रकार घडला. मोसम नदीला छाेटेखानी पुर आला असून दोघे मुले वाहून गेली. रात्री उशिरापर्यंत महापालिका अग्निशामक दल व किल्ला तैराक ग्रुपचे शोधकार्य सुरु होते. मात्र त्यांचा शोध लागू शकला नाही. (Latest Marathi News)

नदीपात्रात मुले वाहून गेली त्यावेळी पुलावरुन काहीजण जात होते. त्यांच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी महापालिका अग्निशामक दलाला कळविले. अग्निशामक दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. सामाजिक कार्यकर्ते शफिक अहमद यांनी किल्ला तैराक ग्रुपला माहिती कळविली. ग्रुपचे सदस्यही अग्निशामक दलाच्या जवानांबरोबर शोध कार्यात गुंतले आहेत. पुलापासून नजीकच प्लॅटिनम दुचाकी मिळून आली. या दुचाकीच्या क्रमांकावरुन (५५५२) दुचाकी मालक डॉ.नाजीम पठाण (रा. गाळणे) यांची माहिती मिळाली.

हेही वाचा: मोफत रेशनसाठी तिरंगा घेण्यास भाग पाडणे लाजिरवाणे; राहुल गांधींचा भाजपवर निशाणा

पठाण यांच्या दुचाकीवरुन त्यांचा मुलगा अब्दुल रहीम पठाण (वय १६) व मेहुण्याचा मुलगा शहजाद जाकीर शेख (वय १९, दोघे रा. गाळणे) हे दोघे दुचाकीने मालेगावी आले होते. दुचाकीने पुलावरुन जात असताना त्यांचा ताबा सुटल्याने दोघेही दुचाकीसह नदीपात्रात बुडाले. पाण्याचा प्रवाह असल्याने ते वाहून गेले. अब्दुल पठाण हा दहावीत शिकत होता. दुपारपासून रात्री उशिरापर्यंत द्याने फरशी पुल ते आंबेडकर पुलापर्यंत शोध मोहिम सुरु होती. या एक किलोमीटरच्या अंतरात अग्निशामक दलाचे जवान व किल्ला तैराक ग्रुपने सर्वत्र शोध घेऊनही ही मुले मिळून आली नाहीत. ऐन मोहरमच्या सणाला ही दुर्घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अग्निशामक दल व पोलिसांनी या घटनेची नोंद केली आहे.

हेही वाचा: Jammu Kashmir : लतीफसह तीन दहशतवादी ठार; लष्कराने घेतला भटच्या हत्येचा बदला

Web Title: 2 Young Man Drowned In Mosam River

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..