कोरोनामुळे नाशिक विभागातून २० हजार ५३२ कामगार स्थलांतरित

Migration
MigrationGoogle

सातपूर (जि. नाशिक) : कोरोनाची भीती व लॉकडाउनमुळे सातपूर, अंबडसह जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतींमधील कंपन्या, हाॅटेलसह विविध आस्थापनांतील १४ हजार ७१, तर विभागातून २० हजार ५३२ कामगार स्थलांतरित झाले आहेत, अशी माहिती कामगार उपायुक्त विकास माळी यांनी दिली. (20 thousand 532 workers migrated from Nashik division due to Corona epidemic)


दरम्यान, कोरोना व लॉकडाउनमुळे हजारो कामगार बेरोजगार झाले आहेत. यातील बहुतांश कामगार शहर सोडून आपल्या राज्यात व गावात स्थलांतरित झाले आहेत. पहिल्या लाटेत याची कुठलीही नोंद देशातील कोणत्याच राज्याच्या कामगार विभागाकडे नव्हती. याबाबत सर्वोच्च न्यायालयाने प्रत्येक राज्यात स्थलांतरित कामगारांची नोंदणी करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने महाराष्ट्रात वेबसाइट तयार करून गावी जाणाऱ्या कामगारांना नोंदणी करण्याचे आवाहन केले होते. मार्चनंतर दुसऱ्या लाटेत पुन्हा लॉकडाउन करण्यात आल्याने उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव, नगर व नाशिकमधील हजारो कामगार बेरोजगार झाले. त्यातील अनेकांचे भाड्याचे घर होते.

Migration
नाशिक-पुणे रेल्वे : बाधित शेतकऱ्यांना मिळणार ५ पट मोबदला?

महागाईमुळे निर्णय

महागाईचा आर्थिक भार सोसावत नसल्याने संसाराचे गाठुडे खांद्यावर घेऊन गावाकडे स्थलांतरित झाले. त्यातील काहींनी कामगार विभागाने तयार केलेल्या वेबसाईटवर नोंदणी केली. या वेबसाईटवरील नोंदणीनुसार नाशिकमधून १४ हजार ७१, जळगावमधून दोन हजार ९०३, नगरमधून तीन हजार ४२३, धुळ्यामधून ७१, तर नंदुरबारमधून ६४ असे विभागातून २० हजार ५३२ कामगार स्थलांतरित झाले आहेत. स्थलांतरित झालेल्या कामगारांमध्ये उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, झारखंड, ओडिशा, राजस्थानसह इतर राज्यांतील कामगार मोठ्या प्रमाणावर आहेत.
(20 thousand 532 workers migrated from Nashik division due to Corona epidemic)

Migration
बागलाणच्या मातीत काश्मीरची सफरचंद; शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com