यंदा शुद्ध विवाहमुहूर्त जानेवारीनंतरच
सिंहस्थ गुरूचे कारण ः जूनअखेरपर्यत तब्बल ५७ विवाह तारखा
------------------
सकाळ वृत्तसेवा
पिंपळगाव बसवंत, ता.१५ ः विवाह हा अत्यंत पवित्र संस्कार मानला जातो. त्यामुळे लग्नाची तारीख निश्चित करताना पंचांगानुसार मुहूर्ताला विशेष महत्त्व दिले जाते. यंदा तुळशी विवाह २१ नोव्हेंबरला असून समाप्ती २४ ला आहे. त्यानंतर लग्नसराईला सुरवात होणार असली तरी लग्नासाठी इच्छुकांना यंदा शुध्द विवाह मुहूर्तासाठी जानेवारीअखेरपर्यत प्रतीक्षा करावी लागणार आहे. सिंहस्थ गुरूमुळे २६ जानेवारी २७ पासून विवाह मुहूर्त सुरू होतील. जूनपर्यत हंगामात तब्बल ५७ शुद्ध मुहूर्त असल्याची माहिती पंचांगतज्ज्ञ शरद आहेर यांनी दिली.
-------------
देवउठनी एकादशी आणि तुळशी विवाहानंतर चातुर्मासाची समाप्ती होत असल्याने लग्नसराईचा हंगाम सुरू होतो. यंदा २० नोव्हेंबरला देवउठनी एकादशी असून त्यानंतर विवाह, गृहप्रवेश या सारख्या कार्यांना सुरवात होणार आहे. विशेष म्हणजे, नोव्हेंबर महिन्यात विवाहासाठी केवळ चार मुहूर्त उपलब्ध असल्याने लग्नाची तयारी करणाऱ्यांना तारखांचे नियोजन करावे लागणार आहे. पंचांगानुसार २० नोव्हेंबरला देवउठनी एकादशी आहे.
धार्मिक मान्यतेनुसार अनुकूल ग्रहस्थिती आणि शुभनक्षत्रांच्या काळात विवाह झाल्यास वधू- वरांच्या वैवाहिक जीवनात सुख, शांती नांदते. त्याप्रमाणे विवाहाची वेळ निश्चित करताना वधूवरांच्या जन्मकुंडलीचे मिलन, मंगळदोष तसेच इतर ग्रहस्थितीचाही विचार केला जातो.
धार्मिक मान्यतेनुसार,अनुकुल ग्रहस्थिती आणि शुभ नक्षत्रांच्या काळात विवाह झाल्यास जीवनात सुख, शांती व र्स्थेर्य नांदते. त्याच प्रमाणे विवाहाची वेळ निश्चित करताना वधू- वरांच्या जन्मकुंडलीचे मीलन मंगळदोष तसेच इतर ग्रहस्थितीचाही विचार केला जातो. त्यामुळे लग्नाची तारीख ठरविताना कुटुंबीयांकडून पंचांग व ज्योतिष सल्ल्याला प्राधान्य दिले जाते असे पंचांगतज्ज्ञ शरद आहेर यांनी सांगितले.
-------
लग्नाचे मुहूर्त असे
नोव्हेंबर २०२६ ः २१,२४.२५,२६ जानेवारी २०२७ ः २६,२७,२९
फेब्रुवारी २०२७ ः २,३,१०,११,१२,१५,२१,२२,२४,२५,२७,२८
मार्च २०२७ ः १०,११,१४,२३,२४,२५,२७,२९,३१
एप्रिल २०२७ ः १,३,१६,१८,२१,२६,२८,२९,३०.
मे २०२७ ः ९,१३,१४,१५,१७,१९,२०,२१,२२,२५,२६,३०,३१
जून २०२७ ः ११,१२,१५,१७,१९,२३,२४
-----------