येवला- ज्या हातांना कष्ट आणि कामाशिवाय काही माहीतच नाही, ज्यांना अक्षराची ओळख नाही अशा निरक्षरांना ‘क’, ‘ख’, ‘ग’ ची ओळख झाली आणि लिहिता वाचता येऊ लागले. नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत तब्बल दोन हजार ८१ निरक्षरांनी येवला तालुक्यात परीक्षा देऊन अक्षरांशी ओळख केली.