फोटो : 34498
नंदुरबार : पदयात्रेच्या प्रारंभप्रसंगी आमदार डॉ. विजयकुमार गावित, डॉ. सुप्रिया गावित, हिरालाल चौधरी आदी.
------------
नवसपूर्तीसाठी २२ किलोमीटरची पदयात्रा
आमदार डॉ. गावितांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी नवस
नंदुरबार, ता. ५ : आमदार डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी केलेला नवस फेडण्यासाठी कार्यकर्ते व ग्रामस्थांच्या सहभागातून नंदुरबार ते नाशिंदा अशी २२ किलोमिटरची पदयात्रा काढण्यात आली.
माजी आदिवासी विकासमंत्री आमदार डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, यासाठी नंदुरबार तालुक्यातील नाशिंदा येथील पावबा ऋषी येथे नवस करण्यात आला होता. आमदार डॉ. गावितांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर नवसपूर्तीसाठी नंदुरबार ते नाशिंदा येथील पावबा ऋषी महाराज तीर्थक्षेत्रापर्यंत २२ किलोमीटरची पदयात्रा काढण्यात आली. ही पदयात्रा नंदुरबारातून उमर्दे खुर्द, वडवद, भालेर, काकर्देमार्ग नाशिंदा येथे पोहोचली. पावबा ऋषींच्या मंदिरात आमदार डॉ. विजयकुमार गावित यांनी पत्नी डॉ. कुमुदिनी गावित, कन्या डॉ. सुप्रिया गावित यांच्यासमवेत विधिवत पूजन करून महाआरती केली. ही पदयात्रा माजी खासदार डॉ. हीना गावित यांच्या मार्गदर्शनात माजी जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित यांच्या उपस्थितीत झाली. पदयात्रेत माजी जिल्हा परिषद सदस्य शांताराम पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष दीपक पाटील, पालिकेतील विरोधी पक्षनेते हिरालाल चौधरी, नगरसेवक पंकज चौधरी, माजी नगरसेवक प्रकाश भोई, आकाश चौधरी, माजी जिल्हा परिषद सदस्य शोभा पाटील, प्रवीण पाटील, होळतर्फे रनाळेचे सरपंच व्यंकट पाटील, बलवंडचे सरपंच संजय पाटील, भालेरचे चंद्रशेखर पाटील, भिका पाटील, रमेश पाटील, माजी उपसरपंच डॉ. मनोज पाटील, कंढरेचे सरपंच लोटन पाटील, सुपडू पाटील आदी सहभागी झाले होते. पदयात्रेचे भालेर, काकर्दे, नाशिंदा येथे स्वागत करण्यात आले.