नाशिक शहर पोलिस ठाण्यांमध्ये लवकरच ‘नवा गडी-नवा राज’

Police
Police

जुने नाशिक : शहर पोलिस आयुक्तालयातील अनेक वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांना पदोन्नती मिळणार असल्याने लवकरच शहर पोलिस आयुक्तालयातील अनेक पोलिस ठाण्यात ‘नवा गडी-नवा राज’, असे चित्र बघावयास मिळणार आहे. सोमवारी (ता. ५) पोलिस महासंचालक कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या पत्रानुसार विविध पोलिस ठाण्यांतील पोलिस निरीक्षकांना बढती मिळून सहाय्यक पोलिस आयुक्तपदी नियुक्त केले जाणार आहेत. त्यामुळे बहुतांशी पोलिस ठाण्यांमध्ये नवीन पोलिस निरीक्षकांची नियुक्ती होणार आहे. 22 senior police inspectors from nashik city limits will be promoted


शहराच्या पोलिस ठाण्यासह मुख्यालयात नियुक्तीस असलेले पोलिस निरीक्षकांना गेल्या काही महिन्यांपासून पदोन्नतीचे वेध लागले होते. सोमवारी अखेर पोलिस महासंचालक कार्यालयाकडून पोलिस आयुक्तालयात प्राप्त झालेल्या परिपत्रकानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांची बढतीच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. पोलिस ठाणेसह मुख्यालयात नियुक्ती असलेले सुमारे २२ पोलिस निरीक्षकांना सहाय्यक पोलिस आयुक्तपदावर बढती देण्याचे निश्चित झाले आहे. त्याचप्रमाणे ग्रामीण पोलिस विभागातील सात पोलिस निरीक्षक यांचाही यामध्ये समावेश आहे. त्या सर्व पोलिस निरीक्षकांचे अहवाल येत्या काही दिवसांत पोलिस महासंचालक कार्यालयास पाठविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यातील ज्या पोलिस निरीक्षकांचे गोपनीय अहवाल तयार केले नाही किंवा ते का तयार केले नाही, या माहितीसह पोलिस निरीक्षक निवृत्त झाले आहे, अशांचे अहवालदेखील कार्यालयास पाठविण्याचे सूचित करण्यात आले आहे.


भद्रकाली पोलिस ठाण्याचे दोन्ही पोलिस निरीक्षक, इंदिरानगर, देवळाली कॅम्प, सरकारवाडा गुन्हे शाखा युनिट एक या ठिकाणी नियुक्त पोलिस निरीक्षकांचा भरतीमध्ये समावेश आहे. तर इतर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक यांच्या शहराबाहेर बदली होणार असल्याचे बोलले जात आहे. यामुळे पोलिस ठाण्यासह विविध विभागात शहराबाहेरील किंवा जिल्ह्याच्या विविध भागातील पोलिस निरीक्षकांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वत्र ‘नवा गडी-नवा राज’, असे चित्र बघावयास मिळणार आहे.

Police
ओबीसी आरक्षणावरुन विधानसभेत भुजबळांकडून विरोधकांची बोलती बंद


…यांना मिळणार बढती

शहर पोलिस आयुक्तालय : साजन सोनवणे, दत्ता पवार, भोये फुल्लदास, मिलिंद बागूल, भारतकुमार सूर्यवंशी, संगीता निकम, बाजीराव महाजन, संजय बोंबले, मनोज कारंजे, कुमार चौधरी, संजय सांगळे, नारायण न्याहाळदे, किशोर मोरे, कमलाकर जाधव, गुरुनाथ नायडू, आनंद वाघ, राजेश आखाडे, महेंद्र चव्हाण, हेमंत सोमवंशी, श्रीकांत परोपकारी, सदानंद इनामदार, नीलेश माईनकर

(ग्रामीण)
संजय महाजन, सुभाष अनमुलावर, सुरेश सपकाळे, शंकर कांबळे, अनंती तारगे, संपत शिंदे, अनिलकुमार बोरसे

Police
HALच्या मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना अर्थसहाय्य योजना लागू

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com