नाशिक : 3 दिवसात कोसळले 22 वृक्ष

सिमेंटचे रस्ते तयार झाल्याने वृक्षांच्या मुळापर्यंत पाणी पोचत नसल्याने अशा प्रकारच्या घटना घडत आहेत.
Tree
Treeesakal

जुने नाशिक : पावसाने गेल्या तीन दिवसात शहराच्या विविध भागात २२ वृक्ष कोसळण्यासह एक आगीची घटना घडली. यात सर्वाधिक मुख्यालय आणि सिडको विभागात प्रत्येकी सहा, असे बारा वृक्ष कोसळले आहे.

बुधवारी (ता. २२) शहरात जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यानंतरही दोन दिवस कमी- अधिक प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे शहराच्या विविध भागात वृक्ष कोसळण्याच्या घटना घडल्या. सर्वाधिक घटना बुधवारी घडल्या. अनेक ठिकाणी सिमेंटचे रस्ते तयार झाल्याने वृक्षांच्या मुळापर्यंत पाणी पोचत नसल्याने अशा प्रकारच्या घटना घडत आहेत. गेल्या तीन दिवसात झालेल्या पावसामुळे अग्निशमन विभागाचा भ्रमणध्वनी सतत खणखणत होता. सतत कॉल येत असल्याने अग्निशामक विभागाच्या कर्मचाऱ्यांची प्रचंड धावपळ उडाली होती. भर पावसात त्यांच्याकडून कोसळलेले वृक्ष बाजूला मार्ग मोकळा करून देत वाहतूक सुरळीत केली. काही ठिकाणी कमी अधिक प्रमाणात नुकसान झाले आहे. वकीलवाडी येथे वृक्ष कोसळून मोबाईलचे दुकान आणि दुचाकीचे नुकसान झाले. इंदिरानगर परिसरात कोसळलेल्या वृक्षांमुळे एक दुचाकी आणि एक कारचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या तीन दिवसात शहर परिसरासह सातपूर, नाशिक रोड, सिडको, पंचवटी, के. के. वाघ अशा सर्वच विभागात घटना घडली आहे. सार्वधिक कमी नाशिक रोड विभागात एकच वृक्ष कोसळला आहे. कोसळलेल्या वृक्षांमध्ये सर्वाधिक वृक्ष गुलमोहराचे आहे. गुलमोहराचे खोड जास्त खोलवर जात नसल्याने पावसाळ्यात ते अधिक धोकादायक असतात. दरवर्षी कोसळणाऱ्या वृक्षांमध्ये त्यांचीच अधिक संख्या असते. .

Tree
राजकीय धूळवडीमध्ये खरिपात शेती अन् फलोत्पादन ‘हँग’

मुख्यालय विभागात : शरणपूर रोड, वकीलवाडी, पखाल रोड, गडकरी चौक, वडाळा नाका, अशोक स्तंभ, पंचवटी विभागात गंगावाडी, जुना गंगापूर नाका, शनि चौक, सिडको विभागात इंदिरानगर, गोविंदनगर, राजीवनगर, नाशिक रोड विभागात शिवाजीनगर जेल रोड, सातपूर विभागात गंगापूर रोड परिसर, सहजीवन नगर कॉलनी, सोमेश्वर कॉलनी, सावरकरनगर, के. के. वाघ विभाग दुर्गानगर, कैलासनगर येथे झाड कोसळले.

असे कोसळले वृक्ष

मुख्यालय विभागात ६

पंचवटी विभाग ३

सिडको विभाग ६

नाशिकरोड विभाग १

सातपूर विभाग ४

केके वाघ विभाग २

Tree
शिवसैनिक आक्रमक : दादा भुसे आणि सुहास कांदेच्या नावाला फासले काळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com