Nashik Crime News : येवल्यातून लाखोंच्या नायलॉन मांजाच्या 240 चकऱ्या जप्त! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nylon manja seized by the police at yeola

Nashik Crime News : येवल्यातून लाखोंच्या नायलॉन मांजाच्या 240 चकऱ्या जप्त!

येवला (जि. नाशिक) : मकरसंक्रातीच्या पार्श्वभूमीवर येथे साजऱ्या होणाऱ्या पतंगोत्सवासाठी येवला नागरी सज्ज होत आहे. अशातच नॉयलॉन मांजा वापरावर बंदी घातलेली असतानाही शहरात नॉयलॉन मांजा छुप्या पद्धतीने विक्रीस येत असल्याची गुप्त माहितीवरून शहर पोलिसांनी छापा टाकत १ लाख २० हजारांचा मांजा जप्त केला आहे. पोलिसांच्या धडक कारवाईमुळे नॉयलॉन मांजा विक्री करणारे व वापरणाऱ्या पतंगप्रेमींमध्ये खळबळ उडाली आहे. (240 rounds of nylon manja worth lakhs seized from Yeola Nashik Crime News)

हेही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

हेही वाचा: Nashik News: आमदारांना पेन्शन, मग आम्हाला का नको? फडणवीसांच्या निर्णयावर शिक्षक, कर्मचाऱ्यांची नाराजी

शहरात तीन दिवस चालणाऱ्या पतंगोत्सावा दरम्यान पतंग उडविणासाठी अधिक उत्तम दर्जाचा दोरा वापरण्यासाठी चढाओढ सुरु असते. यासाठी येथे होममेड मांजा वापरला जात होता. पण आता कोणतेही कष्ट न करता नायलॉन मांजा हा तयार दोरा उपलब्ध झाल्याने शौकीनाकडुन त्याचा मोठ्या वापर होऊ लागला आहे. या मांजामुळे गळा, हात, नाक, कान चिरण्याचे प्रमाण तसेच यामध्ये पक्षी अडकून त्यांचा जीव जाऊ लागल्याने नायलॉन मांजाचा वापर करण्यात येऊ नये तसेच मांजाच्या खरेदी-विक्री, साठवणूक व वापरावर निर्बंध घालण्यात आले.

नायलॉन मांजा विक्रीसाठी बंदी असताना देखील शहरातील थिएटर रोडवरील पॉवर हाऊसजवळ सादिक रफिक मोमीन उर्फ पापा हा एका प्लास्टिकच्या गोणीत मोनो काईट कंपनीचे नॉयलॉन मांजाचे २४० चकऱ्या घेऊन अपे रिक्षा (क्रमांक एम एच १७ व्ही ८८५१) मधून नगरसुलकडे जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावेळी पोलिसांनी पालखेड डावा कालव्याच्या पुढे सापळा रचत रिक्षाला अडवत नॉयलॉन मांजा पकडला.

चार बॉक्समध्ये नॉयलॉन मांजाचे ६० चकऱ्या याप्रमाणे २४० चकऱ्या ताब्यात घेण्यात आल्या. या वेळी पोलिसांनी बजाज रिक्षा व नॉयलॉन मांजा असा १ लाख ७० हजारांचा माल जप्त केला. पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सूरज मेढे, मधुकर गेठे, संदीप पगार, सतीश बागूल, बाबा पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली.

हेही वाचा: Corona Update : सप्तशृंगी गडावर आजपासून ‘मास्क’ बंधनकारक